Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: स्वच्छ

हेल्थ टिप्स-उपयोगी घरगुती उपाय

Deepjeevani Homeहेल्थ टिप्स-उपयोगी घरगुती उपाय

 • चेहरा ब्लीच  करण्यासाठी  कृत्रिम  ब्लीच  वापरण्यापेक्षा कच्चे  बटाटे  मिक्सरमधून  काढून  त्याची पेस्ट  बनवावी.ती  चेहऱ्याला  लावावी.
 • कपड्यांना  चमकदार  बनवणाऱ्या  नीळमिश्रित  पाण्याने  फरशी  पुसल्यास  फरशी  चमकदार  बनते.
 • चेहरा  उजळण्यासाठी  क्लिंजनर  लावले  जाते. पण  कृत्रिम  क्लिंजनर  लावण्यापेक्षा  नारळाचे  पाणी जर  क्लिंजनर   म्हणून  वापरले  तर  खूप  फायदा  होतो
 • घरातील  काचा स्वच्छ करण्यासाठी  एक  बादली  पाण्यात  शाम्पुचे  काही  थेंब  टाकून  त्यावर  शिंपडा व  वृत्तपत्राने  स्वच्छ करा.
 • दोन चमचे  मुलतानी  माती , एक  चमचा  बेसन , चिमूटभर  हळद , दोन  चमचे  लिंबाचा  रस  एकत्र करून  चेहऱ्याला  पंधरा  मिनिटे  लावून  ठेवल्यास  चेहरा  उजळतो.

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


Advertisements

दीपजीवनी टिप्स कट्टा-घरगुती उपाय

दीपजीवनी टिप्स कट्टा

घरगुती  उपाय

 

 • बऱ्याच  घरामध्ये  पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी  गरम  करतात .ज्या भांड्यामध्ये  गरम  करतात  त्या भांड्याच्या  तळाला  सतत पाणी  तापवण्यामुळे  डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी  त्यात  थोडे  व्हिनीगार  घालावे  म्हणजे  हे  सर्व  डाग  स्वच्छ  होतील .

 

 •  प्लॅस्टिकच्या  भाजी  चिरायच्या  ट्रेवर  टोमॅटो  कापल्यावर  लाल  डाग  पडतात . तेव्हा  हा  ट्रे  नेहमीच्या  भांडी घासायच्या  लिक्विड  क्लीनरने  घासून  उन्हात  ठेवावा . हा  डाग  कमी  होतो .

 

 • बाग  काम  केल्यानंतर  बऱ्याचवेळा  हाताची  माती  लवकर  निघत  नाही .तेव्हा  हातावर  साखर  घेऊन  चोळल्यास  साखरेच्या  दाण्यांमुळे हात  साफ  होतात .

 

 •  कारल्याचा  कडवटपणा  कमी  करण्यासाठी  त्यात  मीठ ,पीठ व दही  मिसळून  अर्धा  तास  ठेवावे . नंतर  पाण्याने  स्वच्छ धुवून  घ्यावे .

 

 • गरम  इस्त्री  कपड्यांवर  फिरवल्याने  जर  इस्त्रीच्या तळाला  कापड  चिकटून  इस्त्री  खरबरीत  झाली  असल्यास  ती  कोमट  असताना  मेप्प  कागदावरून  फिरवावी . नंतर  एखाध्या  स्वच्छ कपड्यावरून  किंवा  पेपर  नैपकिनवरून  फिरवावी . आता  इस्त्री  करताना  ती  कपड्यांवरून वेगाने  सरकू शकेल .

 

 •  गंजाच्या  डागांवर  लिंबू  चोळून  ठेवावे. कपडे  धुतल्यानंतर कडक  उन्हात  ते  वाळवावेत .गंजाचा  डाग  बराच कमी  होतो .

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

 

 फिंगर चिप्स-पाककृती खमंग मेजवानी

Click here to see Crunchy delicious Finger Chips Recipe in English

भारतीय पाककृती-फिंगर चिप्स

Finger chipsफिंगर चिप्स बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • ३-४ बटाटे
 • तळण्याकरता तेल
 • मीठ
 • चीमुठ्भर खायचा सोडा
 • ४ कप पाणी
 • चीमुठ्भर हळद


कृती :-

 • बटाट्यांचे साल काढून लांबट बारीक काप करून घ्यावेत .
 • बटाट्याचे काप स्वच्छ धुऊन घ्यावेत .
 • ४ काप पाण्यामध्ये बटाट्याचे काप भिजत ठेवावे . त्यात मीठ ,चीमुठ्भर खायचा सोडा ,चीमुठ्भर हळद घालावी .
 • १५-२० मिनिट झाकून ठेवावे.
 • कढईत तेल गरम करावे .
 • पाणी काढुन बटाट्याचे काप कढईत घालावेत व मंद आचेवर गुलाबी रंगावर कुरकुरीत होइपर्यंत  तळावेत.
 • असे सर्व काप तळून घ्यावेत .
 • नंतर टोमॅटो सॉस बरोबर खायला घ्यावेत.
तर काय मंडळी, संध्याकाळी बनवणार का फिंगर चिप्स…?तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Crunchy delicious Finger Chips Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


चैनीस गोबी मन्चुरिअन-सरळ सोपी

Click here to see Easy to Cook Chinese Gobi Manchurian Recipe!! in English

भारतीय पाककृती||गोबी मन्चुरिअन


चैनीस गोबी मन्चुरिअन बनवण्यासाठी साहित्य:-

 • १ मध्यम आकाराचा फुलकोबी (फ्लॉवर )
 • ३/४ कप मैदा
 • १-१/२ चमचा लसुन पेस्ट
 • २ चमचे तेल
 • १ चमचा मक्याचे पीठ
 • १-१/२ चमचा आलं पेस्ट
 • १ कप बारीक चिरलेले कांदे
 • १/४ चमचा अजिनोमोटो
 • १ हिरवी मिरची बारीक चिरून
 • २-३ चमचा टोमॅटो सॉस
 • २ चमचा सोया सॉस
 • कोंथिबीर बारीक चिरून (सजावटीसाठी )
 • मीठ चवीनुसार
 • पाणी

कृती :-

 • पहिला फुलकोबी (फ्लॉवर )  कापुन स्वच्छ धुवून घ्यावे .
 • नंतर मैदा , मक्याचे पीठ ,मीठ आणि पाणी घालून सर्व मिक्स करून घेऊन पीठाची चांगली पेस्ट  तयार करावी .
 • नंतर त्यात आलं लसुन पेस्ट घालून मिक्स करावे .
 • नंतर  कॉलीफ्लावरचे  फ्लोरेट्स (फ्लॉवरचे तुकडे ) भिजवलेल्या पिठात बुडवून लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत .
 • कढईत तेल गरम करून त्यामध्ये उरलेले आलं ,लसुन पेस्ट ,बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घालून सर्व मिक्स करून घ्यावे .
 • नंतर अजिनोमोटो ,सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालून पुन्हा मिक्स करून घ्यावे .
 • नंतर त्यात तळलेले फ्लोरेट्स घोळवून गरमा गरम सर्व्ह करावे .
 • हवे असेल  तर  सजावटीसाठी  गोबी मन्चुरिअन वरती कोंथिबीर घालावी .
तर काय मंडळी, संध्याकाळी बनवणार का गोबी मन्चुरिअन…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Easy to Cook Chinese Gobi Manchurian Recipe!! in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: