Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: साखर

साधे सरळ घरगुती उपाय/टिप्स

साधे-सरळ-घरगुती-उपाय

 

 

 • भिंतीवर  चिकटलेला  सेलोटेप  अतिशय  खराब  दिसतो . हा  सेलोटेप  काढण्यासाठी  त्यावर  गरम  वस्तू ठेवावी  म्हणजे  हा  टेप  सहज  निघतो .

 

 • लोकरीच्या  शाली , स्वेटर्स  यांना  कसर  लागू   नये  म्हणून  त्यांच्या  घडीत  लवंगा  व  काळ्या  मिरीचे दाणे  ठेवा.

 

 • जखमेतून  होणारा  रक्तस्त्राव  थांबवण्यासाठी  जखमेवर  साखर , कॉफी  पावडर  किंवा  जाळलेला  कापूस लावावा .

 

 • पाण्याच्या  माठाची  छिद्रे  वर्षभर  वापरल्यावर  बुजतात . दर  २  महिन्यांची  माठ  चोळून  धुवावा  व  पंधरा  मिनिटे  गॅसवर  चांगला  तापवावा . छिद्रे  मोकळी  होतात  व  पाणी  छान  थंड  होते .

 

 • भाजल्यामुळे  झालेल्या  जखमांवर  तांदळाचे  पीठ  लावल्यास  थंडगार  वाटते . जखम  भरण्यास  तात्पुरती  मदत  होते .

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

माझे घर माझे घरगुती उपाय

माझे घर माझे घरगुती उपाय

 • छोटे  छोटे  कपडे  फारच  मळलेले  असतील  तर  साबण, सोडा  घालून  प्रेशर  कुकरमधून  शिट्टी  करून काढावेत. भट्टी  केल्यासारखे   घराच्या  घरी  स्वच्छ  होतात.

 • रंग  गेल्याने  फिकट  झालेली  जीन  पॅन्ट  नव्या  कोऱ्या  जीनच्या  पॅन्टबरोबर  धुलाई  मशीनमध्ये  धुतल्यास  नवीन  पॅन्टचा  रंग  जुन्या  फिकट  पॅन्टला  बसून  जुनी  पॅन्टही  छान  दिसू  शकते.

 • गॅसची  शेगडी  धुताना  दोन्ही  बर्नरवर  स्टीलच्या  वाट्या  पालथ्या  घालाव्यात .बर्नरच्या  छिद्रातून  पाणी , कचरा , साबण  आत  शिरणार  नाही  व  गंज  चढणार  नाही.

 • घरात  छान  फ्रेश  सुगंध  दरवळावा  असे  वाटत  असेल  तर ( विशेषत; स्वयंपाकात मासळी असेल तर)  एका भांड्यात  पाणी  उकळत  ठेवून  त्यात  संत्राच्या  साली  टाकाव्यात.

 • दोडक्याच्या शिरा ,लाल  भोपळ्याची साले, कोथिबिरीच्या  काड्या  टाकून  न देता तव्यावर परतवून त्यात मिरची, मीठ, साखर, तीळ, लिंबू  पिळून  हा  ठेचा  करावा. अत्यंत  चविष्ट  होतो.


पुरणपोळ्या पाककृती-खमंग मेजवानी

 Click here to see Maharastrian special dish – Puran Poli recipe in English
                                

भारतीय पाककृती||पुरणपोळ्या

For More Visit: www.Deepjeevani.com

For More Visit: www.Deepjeevani.com

साहित्य :-

 • ३  वाट्या हरभरा डाळ
 • ३  वाट्या चिरलेला गूळ
 • १  वाटी साखर
 • अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
 • ३  वाट्या कणीक
 • ३  टे.स्पून मैदा,  चिमुटभर  मीठ,  पाऊन  वाटी  तेल,  तांदळाची पिठी

कृती :-

 • हरभरा  डाळ स्वच्छ  निवडून  धुवून घ्यावी.
 • प्रेशर  कुकरमध्ये  हरभरा  डाळ  शिजवून  घ्यावी.
 •  शिजलेली  डाळ  चाळणीवर  उपसून  पाणी  काढून  घेणे.  ह्या  पाण्याला  पुरणाचा  कट  म्हणतात.  पुरणपोळी बरोबर त्याचीच  आमटी  करतात.  पुरणाचा  कट  काढल्याने  पोळी  हलकी  होते.
 • डाळ  एका  जाड  बुडाच्या  पातेल्यात  घालून  थोडी  डावाने  घोटावी.  त्यात  गूळ  व  साखर  घालून  शिजवायला  ठेवावी.
 • पुरण  चांगले  शिजले  की  पातेल्याच्या  कडेने  सुटू  लागते.  शिजवताना  प्रथम  पातळ  होते  व  नंतर  झाऱ्याला  घट्ट  लागू लागते.
 • पुरणयंत्राला  बारीक  जाळीची  ताटली  लावावी  व  शिजलेले  पुरण  गॅसवरून  उतरवून  त्यात  जायफळ,  वेलदोडे पूड  घालून गरम  असताना  पुरणयंत्रातून  वाटून  घ्यावे.
 •  कणीक व मैदा  चाळणीने  चाळून  घ्यावा  व  चिमुटभर   मीठ,  पाव  वाटी  तेल  टाकून  कणीक  सैलसर  भिजवावी.
 • २ तास  कणीक  भिजल्यावर  परातीत  काढून  पाणी  लावून  हाताने  चांगली  तिंबावी.  पाण्याबरोबर  वारंवार  तेलाचा वापर  करावा.  कणीक  चांगली  मळून  सैल  झाली  पाहिजे.
 • वाटलेले  पुरण  हाताने  सारखे  करून  घ्यावे. तांदळाची  पिठी  हाताला  लावून  कणकेचा  छोटा  गोळा  हातावर  घ्यावा. साधारण  कणकेच्या  गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
 •  पोळपाटावर  पिठी  घेवून  हलक्या  हाताने  पोळी  लाटावी  व  मंद  आचेवर   तव्यावर  गुलाबी  सारखे  डाग  पडेपर्यंत भाजावी. ह्याच  रीतीने  सर्व  पोळ्या  कराव्यात.
तर काय मंडळी, बनवणार का गोड पुरणपोळ्या…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा
 Click here to see Maharastrian special dish – Puran Poli recipe in English

साबुदाणा वडा-उपवासाचे खाद्य पदार्थ

Click here to see Indian Sabudana Vada – Sago Vada Recipe in English

भारतीय पाककृती-साबुदाणा वडा

For more visit www.Deepjeevani.com

For more visit www.Deepjeevani.com

साबुदाणा वडा बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • २ मध्यम आकाराचे बटाटे उकडलेले
 • १ वाटीभर साबुदाणा
 • १ वाटी दाण्याचे कूट
 • ५-६ हिरव्या मिरच्या
 • १/२ चमचा जिरे वाटून
 • कोथिंबीर
 • मीठ
 • १/२ चमचा साखर
 • तेल

कृती :-

 • साबुदाणा  भिजवून  ठेवावा . भिजवताना  पाव  वाटी  पाणी  ठेवावे   व  ५-६  तास  झाकून  ठेवावे  .
 • बटाटे  सोलून  कुस्करून  घ्यावे  किंवा  किसणीवर  किसून  घ्यावे .
 •  भिजलेला  साबुदाणा , बटाटा , दाण्याचे कूट ,  वाटलेले जिरे ,  मिरची , मीठ ,  साखर , थोडी कोथिंबीर चिरून  घालून  सर्व  जिन्नस  एकत्र  करून  चांगले  एकजीव  मळून  घ्यावेत . मळताना  खूप  कोरडे वाटल्यास  थोडा  पाण्याचा  हात  लावावा .
 • नंतर  पिठाचा  लिंबा एवढा  गोळा  गोल  थापावा  (फार  पातळ  थापू  नये )
 • कढईत तेल  तापत  ठेवावे . तापल्यावर  गॅस  मध्यम आचेवर  ठेवावा . व  वडा  कढईत  सोडावा.
 • मंद  आचेवर  गुलाबी  रंगावर  वडे  तळावेत.
 • वरील  पद्धतीने  सर्व  वडे  तळावेत . गरमा गरम  वडे  चटणी  किवा  टोमॅटो  सॉस  बरोबर  खायला  घ्यावेत
तर काय मंडळी, बनवणार का साबुदाणा वडा…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

Click here to see Indian Sabudana Vada – Sago Vada Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: