Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: सकाळी

असं असतं का प्रेम?

असं असतं का प्रेम?

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.

“”आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?”

“”नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.”

“”हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?”

“”हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.”

“”अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील…?”

“”नाही डॉक्‍टर. तिला “अल्झायमर्स’ झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.” आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, “”आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?”

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, “”डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.”

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, “”हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं – त्या गृहस्थांसारखं.”

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-

“”चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही – पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.”

यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं….

खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?…

Source: Internet

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

साधे सरळ घरगुती टिप्स

 

साधे सरळ घरगुती टिप्स

 

  • किरकोळ भाजल्यास नारळाची शेंडी जाळून त्याची राख खोबरेल तेलात  बुडवून बरेच दिवस लावावेत. डाग असलेला निघून जाईल.

 

  • जायफळ, रक्तचंदन व काळेमिरे उगाळून त्याचा लेप रात्री चेहऱ्यास लावा  व सकाळी धुऊन टाकावा. डाग दूर होतात.

 

  • डोकं दुखल्यास लिंबू लावावा. म्हणजे डोकं दुखणं कमी होईल. परंतु लिंबू  डोळ्यात जावू देऊ नये.

 

  • उन्हात जाऊन त्वचा काळपट झाल्यास टोमॅटोचा रस लावावा .

 

  • सर्दीने नाक गळत असल्यास हळदीचा धूर घेतल्यास नाक वाहने थांबते.

 


मराठी कट्टा-(विनोदी विश्व)

[गैरहजर ]

ऑफिसात  नेहमी  गैरहजर  राहिल्याच्या  कारणावरून  मॅनेजरने  मला  कामावरून  काढून  टाकले.

अरे  पण  तू काहीतरी  कारण  सांगायचं ! माझे  वडील  आजारी  होते. त्यांच्यासाठी मला  रोज  हॉस्पिटलमध्ये जाव  लागायचं.

तसं  शक्य  नव्हत ! का ?

कारण  माझे  वडिलच  तिथं  मॅनेजर  होते.

[येरे  येरे  पावसा ]

एक  माणूस  देवळात  येऊन  मूर्तीकडे  पाहून  पाऊस  पडायची  प्रार्थना  करतो.  ते  पाहून  पुजारी त्याला  विचारतो,

तू  शेतकरी  आहेस  का?

त्यावर  तो  माणूस  उद्गारतो, ” नाही  नाही,  माझं  छत्र्यांच  दुकान  आहे.”

[घड्याळ   समजत  नाही ]

राजू :- (नोकरास ) – ” उद्या  मला  सकाळी  सहाला  उठव,  मला  अभ्यास  करायचाय.”

नोकर :- ” पण  बाळ,  मला  घड्याळ  समजत  नाही.  तू  असं  कर,  सहा  वाजले  की  मला  सांग,  मी  तुला उठवीन.”

[शिकवण ]

सोनू :- “आमच्या  पोपटाचा  उजवा  पाय  ओढला  की  तो  ‘हेलो’’ म्हणतो  आणि  डावा  पाय  ओढला  की ‘गुडबाय’.

सोनू :- “अस्स”. मग  दोन्ही  पाय  एकदम  ओढले  तर?”

पोपट – (मध्येच) “अरे  मुर्खा,  मी  पडेन  की !”

[संगीत]

संगीत  शिक्षक  छोट्या  मुलाला  संगीत  शिकवताना  आरोहाची  संज्ञा   देताना  सांगतात.

” सा रे गा मा   मा  गा रे सा !”

मुलगा :- ” सारेगा  मारेगा  मामा !”

[उतर]

गुरुजी :- ” बंड्या  उठ,  चार  वन्य  प्राण्यांची  नावे  सांग.”

बंड्या :- ” एक  सिंह  आणि  तीन  वाघ.”

[सीट  नाही]

एका  विध्यार्थीने  कॉलेजात  प्रवेश  घेण्यासाठी  अर्ज  केला.  त्यावेळी  त्याचा  अर्ज  परत  करत  तेथील  कार्यालय प्रमुख   म्हणाला.

” माफ  करा.  तुम्हाला  प्रवेश  मिळू  शकणार  नाही.  आता  कोणती ही  सीट  रिकामी  नाही.”

” सर,  तुम्ही  मला  फक्त  प्रवेश  द्या,  सीटचा  बंदोबस्त  मी  स्वतः  करेन.  माझ्या  वडिलांचं  फर्निचरच  दुकान आहे.”

विध्यार्थी  लगेच  म्हणाला.

 

Hope you liked ” मराठी कट्टा-(विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: