Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: रात्री

मराठी कविता सकाळ -the morning

सकाळ

If you are done with reading “मराठी कविता सकाळ -the morning”..

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

उपयोगी घरगुती उपाय व टिप्स

उपयोगी घरगुती उपाय व टिप्स

 •  सोने , चांदी व धातूच्या  नेकलेसच्या  चेनचा  गुंता  झाला  तर  गाठीवर  तेलाचे  दोन – तीन  थेंब  टाका. दोन टाचण्याच्या   मदतीने ती  गाठ  सहज सोडवता  येते.

 • गिटारचा   पुष्ठभाग  चकचकीत  दिसावा यासाठी  त्यावर बोटाने टूथपेस्ट  चोळावी . सुकल्यावर  फडक्याने  घासून  स्वच्छ  करावे.

 • पाण्यात  थोडी साखर विरघळून घ्या व  त्यामध्ये सोन्याचे  दागिने  बुडवून  ठेवा . नंतर स्वच्छ  पाण्याने धुवा. दागिने  चमकू  लागतील.

 • ताजे  मटार  दाणे  उकडल्यावर  त्यावर  लगेच  थंड  पाणी  ओता.  त्याचा  हिरवा  रंग  आहे  तसाच  राहतो.

 • भजी  चांगली  कुरकुरीत  होण्यासाठी बेसनात  मोहन  न  घालता  तेवढेच  गरम  पाणी  घाला.

 • रात्री शांत  न  झोप  येणाऱ्यांनी  शांतपणे  झोप  यावी ,  यासाठी  झोपण्यापूर्वी एक  कप  गरम  व  गोड  दुध  प्यावे.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


मराठी कट्टा पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)

 संता : मला   वाटतं,  ती  तरुणी  बहिरी  आहे .

 बंता : तुला  कसे  माहीत ?

 संता : मी  आता  तिच्यासमोर  माझे  प्रेम  व्यक्त  केले,  तर  ती  म्हणते  कालच  नवीन  चप्पल  खरेदी केलेय.

शाळेला  आग  लागलेली  असते.  आता  आपल्याला  शाळेत  यावे  लागणार  नाही,  या  आनंदात  विध्यार्थी असतात . पण  एकच  विधार्थी  उदास  असतो .

शिक्षक: तू  उदास  का  आहेस ?

विधार्थी : सर , मला  प्रश्न  पडलाय , इतक्या  मोठ्या  आगीतून  तुम्ही  जिवंत  कसे ?

 बाबा : तू  आईशी  इतका  आवाज  चढवून  कसा  बोलू  शकतोस ?

 चिंटू: बाबा , तुम्हाला  कमीपणा  वाटतोय  का ?

 बाबा : का  बर ?  अस  का  म्हणतोस ?

 चिंटू: तुम्ही  मोठ्या  आवाजात  बोलू  शकत  नाहीत  ना?

भिकारी : साहेब ,  मला  १५०  रुपये  द्या . माझ्या  परिवाराला  भेटायचं  आहे……..

साहेब : कुठे  आहेत  तुझे  कुटुंब ?

भिकारी : मल्टीप्लेक्समध्ये  सिनेमा  बघत  आहेत .

पत्नी: लवकरच  आपण  दोनाचे  तीन  होणार  आहोत .

पती : ही  बातमी  ऐकून  मला  खूप  आनंद  झाला .

पत्नी : माझी  आई  आज  रात्रीच्या  विमानाने  येणार  म्हणून  तुम्हाला  इतका  आनंद  झाला …..?

एक  विधार्थी  अचानक  क्लासमधून  उठून  चालत  बाहेर  जाऊ  लागला .

प्राध्यापक: क्लास  सुटायच्या  आत  हा  बाहेर  कुठे  चाललंय?

विधार्थी: सर, त्याला  झोपेत  चालायची  सवय  आहे.

हुदयाच्या  ऑपरेशनला  बायपास  का  म्हणतात ?

कारण  ऑपरेशन   ठीक  झाल  तर  पास, नाही  तर  बाय ……..?

पती: डार्लिंग…… माझा  पगार  आपल्याला  पुरेसा  आहे  ना ?

पत्नी : ह,  माझ्यासाठी  तो  कसाबसा  पुरवून   घेईन  पण  तुमचं  काय ?

परीक्षक:   मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  काय ?

विधार्थी:  मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  सर्फ  एक्सेलचा  नवीन  प्रकार,  ज्याचा  वापर  कॉम्प्युटर  धुण्यासाठी  केला  जातो .

 

Hope you liked “मराठी कट्टा-पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


छोलेची ग्रेवी रेसिपी-पाककृती

Click here to see Indian Chole gravy Recipe in English

भारतीय पाककृती-छोले

छोलेची ग्रेवी बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • १०० ग्रॅम काबुली चणे
 • २ कांदे
 • १ टोमॅटो
 • ३ टेबलस्पून तेल
 • १ टेबलस्पून धने ,जिरे पावडर
 • १ टेबलस्पून तिखट
 • ३ हिरव्या मिरच्या
 • छोले मसाला
 • चाट मसाला
 • हळद
 • आलं , लसून पेस्ट
 • मीठ

कृती:-

 • छोले करण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री काबुली चणे निवडून पाण्यात भिजवावेत.
 • दुसऱ्या दिवशी चणे स्वच धुवून प्रेशर कुकरमध्ये चणे बुडतील एवढे पाणी घालून उकडावे .चणे चांगले बोटचेपे उकडून घ्यावेत.
 • कांदे चिरून वाटावेत किंवा बारीक किसणीवर किसावेत.
 • टोमॅटो बारीक चिरावेत.
 • तेल तापवून त्यात किसलेला कांदा घालावा. कांदा परतावा. परतून गुलाबी रंगावर झाला कि १ टेबलस्पून तिखट आणि धने पावडर घालून परतावे.
 • परतलेल्या कांद्यात १ टेबलस्पून छोले मसाला घालून परतावे. चांगले परतून तेल बाजूला सुटेल म्हणजे चिरलेले टोमॅटो, हिरव्या मिरच्या ,वाटलेले आल ,लसून घालून परत परतावे.
 • वरील परतलेल्या मसाल्यात शिजलेले छोले घालावेत व चवीनुसार मीठ घालावे . चांगली उकळी आली की १/२ टेबलस्पून चाट मसाला आणि चिरलेली कोंथिबीर घालावी.
तर काय मंडळी, बनवणार का खमंग छोले रेसीपी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Indian Chole gravy Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: