Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: मिरची

अंड्याची भूर्जी-अंडा भूर्जी

Click here to see Anda Bhurgi recipe in English

भारतीय पाककृती||अंड्याची भूर्जी

Anda Bhurgiसाहित्य :-

 • ४ अंडी
 •  २ मोठा  कांदा  बारीक  चिरून
 • १ मोठा  टोमॅटो बारीक  चिरून
 • २ हिरव्या  मिरच्या  बारीक  चिरून
 • मूठभर  चिरलेली  कोथिंबीर
 •  २ चमचा  तेल
 •  लाल  तिखट  अर्धा  चमचा
 •  अर्धा  चमचा  जिरे
 • चवीनुसार  मीठ

कृती :-

 • खोलगट  फ्राईंगपॅन  किंवा  कढईमध्ये  तेल  गरम  करावे. त्यात  जिरे  घालावे.  त्यात  बारीक  चिरलेला कांदा,  मिरची  परतून  घ्यावी.  कांदा  गुलाबी  झाला  की टोमॅटो घालून  परतावे.
 • एका  पातेल्यात  अंडी  हलकी  फेटून  घ्यावीत  व  परतलेला  कांदा  टोमॅटोवर  घालावा.  चवीनुसार  मीठ व अर्धा  चमचा  लाल  तिखट  घालून  ढवळावे.  ढवळून  अंडे  पूर्ण  कोरडे  झाले  की  कोथिंबीर  घालून उतरवावे.
तर काय मंडळी, बनवणार का अंड्याची भूर्जी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

Click here to see Anda Bhurgi recipe in English

You may also interested in,

Advertisements

माझे घर माझे घरगुती उपाय

माझे घर माझे घरगुती उपाय

 • छोटे  छोटे  कपडे  फारच  मळलेले  असतील  तर  साबण, सोडा  घालून  प्रेशर  कुकरमधून  शिट्टी  करून काढावेत. भट्टी  केल्यासारखे   घराच्या  घरी  स्वच्छ  होतात.

 • रंग  गेल्याने  फिकट  झालेली  जीन  पॅन्ट  नव्या  कोऱ्या  जीनच्या  पॅन्टबरोबर  धुलाई  मशीनमध्ये  धुतल्यास  नवीन  पॅन्टचा  रंग  जुन्या  फिकट  पॅन्टला  बसून  जुनी  पॅन्टही  छान  दिसू  शकते.

 • गॅसची  शेगडी  धुताना  दोन्ही  बर्नरवर  स्टीलच्या  वाट्या  पालथ्या  घालाव्यात .बर्नरच्या  छिद्रातून  पाणी , कचरा , साबण  आत  शिरणार  नाही  व  गंज  चढणार  नाही.

 • घरात  छान  फ्रेश  सुगंध  दरवळावा  असे  वाटत  असेल  तर ( विशेषत; स्वयंपाकात मासळी असेल तर)  एका भांड्यात  पाणी  उकळत  ठेवून  त्यात  संत्राच्या  साली  टाकाव्यात.

 • दोडक्याच्या शिरा ,लाल  भोपळ्याची साले, कोथिबिरीच्या  काड्या  टाकून  न देता तव्यावर परतवून त्यात मिरची, मीठ, साखर, तीळ, लिंबू  पिळून  हा  ठेचा  करावा. अत्यंत  चविष्ट  होतो.


दम आलू पाककृती-खमंग मेजवानी

Click here to see Tasty and Spicy Indian Dum Aloo Recipe in English

दम आलू

Dum Alooदम आलू बनवण्यासाठी साहित्य :-

 • छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे
 • चिमुटभर हिंग
 • १/२ चमचा हळद
 • १ चमचा मिरची पावडर
 • १ मध्यम आकाराचा कांदा
 • २ कप दही
 • ४-५ तमालपत्राची  पाने
 • १ चमचा आलं ,लसुन पेस्ट
 • ४ चमचे तेल
 • १/२ कप दुध
 • मीठ चवीनुसार

मसाल्यासाठी :-

 • २ वेलदोडे
 • ७-८ मिरे
 • १ चमचा धने
 • १/४ चमचा शहाजिरे
 • ४-५ लवंगा
 • १ लहान दालचिनी

कृती :-

 • पहिला मसाल्याचे साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून बाजूला ठेवावे .
 • बटाटे प्रथम धुवून बेताचे उकडून सोलावेत .
 • कढईत तेल तापवून सर्व बटाटे खमंग तळावेत व बाजूला ठेवावेत .
 • कढईत  बटाटे तळून  उरलेले तेल थोडे कमी करावे व उरलेल्या तेलात कांदा ,हिंग ,तमालपत्र आणि आलं लसुन पेस्ट घालून परतावे .
 • हे मिश्रण गुलाबी रंगावर परतला गेला की तेल सुटू लागते .
 • नंतर त्यात बारीक वाटून ठेवलेला मसाला मिक्स करून २-३ मिनिटे मध्यम आचेवर झाकून ठेवावे.
 • नंतर त्यात हळद ,मिरची पावडर आणि मीठ घालून परतावे .
 • नंतर तेल सुटायला लागले की गॅस मोठा करून दही आणि दुध घालून डावाने घोटावे .
 • मिश्रण जाड वाटल्यास थोडे उकळते पाणी घालून ढवळावे .
 • नंतर त्या मिश्रणात तळलेले बटाटे घालून परतावे .
 • सर्व मसाला बटाट्यांना सर्वत्र लागला पाहिजे .आणि गॅस बंद करून भाजीला दोन चांगल्या वाफा द्याव्यात.
 • आवडत असल्यास सजावटीसाठी कोंथिबीर घालून सर्व्ह करावे .
तर काय मंडळी, बनवणार का खमंग दम आलू…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Tasty and Spicy Indian Dum Aloo Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: