Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: माती

चलां जरा हसू आणि हसवू (Some PJ’s)

वरप्रतिज्ञा

सासुरवाडी माझा देश आहे.

सासू-सासरे आणि त्यांचे सगेसोयरे हे माझे बांधव आहेत.

माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे.

तिच्या घरातल्या विविधतेने नटलेल्या वस्तूंवर माझा डोळा आहे.

तिच्या वडिलांचा घरजावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या सासू-सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेन.

आपल्या कृत्यांनी सासू-सासऱ्यांना काशीयात्रेला जाण्यास प्रेरित करीन, अशी प्रतिज्ञा मी करीत आहे.

माझी बायको व माझ्या मेव्हण्या यांच्यातच माझे सौख्य सामावलेले आहे

जगातली सर्वात छोटी भयकथा

जगातला शेवटचा माणूस रात्री खोलीत एकटा असताना त्याच्या दरवाजावर ठक् ठक् झाली!!!!

वसई पूवेर्च्या उर्मट रिक्षावाल्याला (द्विरूक्तीबद्दल क्षमस्व) संताने विचारले, ”एव्हरशाइन सिटीला येतोस का?”

रिक्षावाला म्हणाला, ”चाळीस रुपये होतील.”

संता म्हणाला, ”दहा रुपये देतो.”

रिक्षावाला म्हणाला, ”दहा रुपयात कोण नेईल?”

संता म्हणाला, ”मागे बस. मी नेतो!!!!”

दारूने नशा होते…

नशेने उत्साह वाढतो…

उत्साहात मेहनत वाढते…

मेहनतीने पैसा वाढतो…

पैशाने इज्जत वाढते…

म्हणजेच…

इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!!

स्कॉच खरोखरच बेस्ट असते…

ती प्यायल्यावर प्रत्येक गोष्ट डबल दिसू लागते आणि पिणाऱ्याला आपण ‘सिंगल’च असल्यासारखे छान वाटू लागते!!

देवावर श्रद्धा ठेवा…

पण, घराबाहेर पडताना लॅच-कुलूप सर्व लावा!!!

पृथ्वीवर जन्माला आल्याचा एक तरी फायदा आहेच…

दरवषीर् सूर्याभोवती फुकट चक्कर मारायला मिळते!!!

प्रत्येक यशस्वी माणसामागे एक स्त्री असते…

आणि प्रत्येक अपयशी माणसामागे दोन असतात!!!

आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांत फरक काय?

आपण आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आत्मविश्वास…

आणि फक्त आपणच आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला अतिआत्मविश्वास!!!!

हॉलमधून धावत अर्जुन किचनमध्ये आला आणि अंजलीला म्हणाला, ”आई गं! बघ बघ! टीव्हीत बाबा सिक्सरवर सिक्सर मारतायत!”

अंजली म्हणाली, ”बेटा, नीट बघ. जाहिरात असेल ती!!!”

संता-बंता जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”

बंता हसत उत्तरला, ”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”

संता समुदात आंघोळीला गेला तेव्हा समोरून येणाऱ्या प्रचंड लाटेला ‘हो हो’ असे म्हणत लाटेखाली चिरडून वाहून का गेला?…

कारण लहानपणापासून आईने त्याला सांगितले होते, ”पाण्याला कधी नाही म्हणू नये!!!’

 

Hope you liked ” चलां जरा हसू आणि हसवू”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

दीपजीवनी टिप्स कट्टा-घरगुती उपाय

दीपजीवनी टिप्स कट्टा

घरगुती  उपाय

 

  • बऱ्याच  घरामध्ये  पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी  गरम  करतात .ज्या भांड्यामध्ये  गरम  करतात  त्या भांड्याच्या  तळाला  सतत पाणी  तापवण्यामुळे  डाग पडतात. हे डाग घालवण्यासाठी  त्यात  थोडे  व्हिनीगार  घालावे  म्हणजे  हे  सर्व  डाग  स्वच्छ  होतील .

 

  •  प्लॅस्टिकच्या  भाजी  चिरायच्या  ट्रेवर  टोमॅटो  कापल्यावर  लाल  डाग  पडतात . तेव्हा  हा  ट्रे  नेहमीच्या  भांडी घासायच्या  लिक्विड  क्लीनरने  घासून  उन्हात  ठेवावा . हा  डाग  कमी  होतो .

 

  • बाग  काम  केल्यानंतर  बऱ्याचवेळा  हाताची  माती  लवकर  निघत  नाही .तेव्हा  हातावर  साखर  घेऊन  चोळल्यास  साखरेच्या  दाण्यांमुळे हात  साफ  होतात .

 

  •  कारल्याचा  कडवटपणा  कमी  करण्यासाठी  त्यात  मीठ ,पीठ व दही  मिसळून  अर्धा  तास  ठेवावे . नंतर  पाण्याने  स्वच्छ धुवून  घ्यावे .

 

  • गरम  इस्त्री  कपड्यांवर  फिरवल्याने  जर  इस्त्रीच्या तळाला  कापड  चिकटून  इस्त्री  खरबरीत  झाली  असल्यास  ती  कोमट  असताना  मेप्प  कागदावरून  फिरवावी . नंतर  एखाध्या  स्वच्छ कपड्यावरून  किंवा  पेपर  नैपकिनवरून  फिरवावी . आता  इस्त्री  करताना  ती  कपड्यांवरून वेगाने  सरकू शकेल .

 

  •  गंजाच्या  डागांवर  लिंबू  चोळून  ठेवावे. कपडे  धुतल्यानंतर कडक  उन्हात  ते  वाळवावेत .गंजाचा  डाग  बराच कमी  होतो .

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

 

 %d bloggers like this: