Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Tag: चाट मसाला

बटाट्याची भजी-बटाटा पकोडा

Click here to see Aloo Pakoda Recipe in English

                                                बटाट्याची भजी

Aloo Ka Pakodaसाहित्य  :-

 • ३-४ मोठे बटाटे
 • २ वाट्या भरून डाळीचे पीठ
 • २ टेबलस्पून तांदळाची पिठी
 • १ चहाचा चमचा तिखट
 • अर्धा चमचा हळद
 • ३ टेबलस्पून तेल
 • चवीनुसार मीठ
 • चिमूटभर सोडा
 • चिमूटभर हिंग
 • २ टेबलस्पून चाट मसाला [ optional ]
 • तळण्याकरता तेल.

 

कृती:-

 • बटाटे साल काढून गोल पातळ चिरावेत व मिठाच्या पाण्यात १०-१५ मिनिटे घालून ठेवून हाताने चोळून बाहेर काढावेत व चाळणीत निथळत ठेवावेत.
 • डाळीच्या पिठात २ टेबलस्पून तांदळाची पिठी, ३ टेबलस्पून तेल कडकडीत करून घालावे,त्यात तिखट,हळद व चवीनुसार मीठ घालावे. पीठ सरबरीत कालवावे. त्यात चिमूटभर सोडा व हिंग घालावा.
 • कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर बटाट्याची एक एक चकती पिठात बुडवून भजी घालावीत व खरपूस तळावीत.
 • गरम गरम सर्व्ह करावे !

 

तर काय मंडळी, बनवणार का झटपट बटाट्याची भजी-बटाटा पकोडा…? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Aloo Pakoda Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

मसाला पापड पाककृती- खमंग मेजवानी

Click here to see Masala Papad Recipe in English

मसाला पापड

 

 

MasalaPapad1साहित्य :-

 • ४ पापड
 • १ मोठा कांदा, बारीक चिरून
 • २ लहान टोमॅटो, बारीक चिरून
 • १ टिस्पून लाल तिखट
 • २ टिस्पून चाट मसाला
 • २ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
 • मीठ चवीनुसार
 • तेल, पापड तळण्यासाठी.

 

कृती :-

 • प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. नंतर बाजूला ठेवावे. ह्या मिक्शर ला मसाला पापाडचा टोप्पिंग म्हणू शकतो.
 • एका पनमध्ये पापड बुडण्याइतपर्यंत तेल गरम करावे. नेहमी प्रमाणे पापड तळून घ्यावे.
 • पापडावर चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरावे.
 • आता पापडावर मिक्स केलेलं टोप्पिंग पसरावा.
 • पुन्हा येगदा टोप्पिंग केलेल्या पापडावर चाट मसाला भुरभुरावे.
 • लगेच सर्व्ह करावे.

 टिप्स :-

 • मसाला पापड लगेच सर्व्ह करावे. कारण हा पापड कांदा आणि टोमॅटो असल्याने लवकर मऊ होतो.
तर काय मंडळी, बनवणार का चटपटा मसाला पापड…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Masala Papad Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


छोलेची ग्रेवी रेसिपी-पाककृती

Click here to see Indian Chole gravy Recipe in English

भारतीय पाककृती-छोले

छोलेची ग्रेवी बनव्ण्यासाटी साहित्य :-

 • १०० ग्रॅम काबुली चणे
 • २ कांदे
 • १ टोमॅटो
 • ३ टेबलस्पून तेल
 • १ टेबलस्पून धने ,जिरे पावडर
 • १ टेबलस्पून तिखट
 • ३ हिरव्या मिरच्या
 • छोले मसाला
 • चाट मसाला
 • हळद
 • आलं , लसून पेस्ट
 • मीठ

कृती:-

 • छोले करण्यापूर्वी आदल्या दिवशी रात्री काबुली चणे निवडून पाण्यात भिजवावेत.
 • दुसऱ्या दिवशी चणे स्वच धुवून प्रेशर कुकरमध्ये चणे बुडतील एवढे पाणी घालून उकडावे .चणे चांगले बोटचेपे उकडून घ्यावेत.
 • कांदे चिरून वाटावेत किंवा बारीक किसणीवर किसावेत.
 • टोमॅटो बारीक चिरावेत.
 • तेल तापवून त्यात किसलेला कांदा घालावा. कांदा परतावा. परतून गुलाबी रंगावर झाला कि १ टेबलस्पून तिखट आणि धने पावडर घालून परतावे.
 • परतलेल्या कांद्यात १ टेबलस्पून छोले मसाला घालून परतावे. चांगले परतून तेल बाजूला सुटेल म्हणजे चिरलेले टोमॅटो, हिरव्या मिरच्या ,वाटलेले आल ,लसून घालून परत परतावे.
 • वरील परतलेल्या मसाल्यात शिजलेले छोले घालावेत व चवीनुसार मीठ घालावे . चांगली उकळी आली की १/२ टेबलस्पून चाट मसाला आणि चिरलेली कोंथिबीर घालावी.
तर काय मंडळी, बनवणार का खमंग छोले रेसीपी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Indian Chole gravy Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: