Advertisements

Tag: आनंद

दिपजीवनी सुविचार कोश- शाळा मराठी सुविचारांची

Deepjeevani_Blackboard1

Hope you like Deepjeevani Suvichar Blackboard “दिपजीवनी  सुविचार  कोश- शाळा मराठी सुविचारांची”..?

If yes, share with your friends. It’s always good to follow good rules in life 🙂

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

वर्गीकृत शब्दावली – खाद्य पदार्थ शब्दकोश

        अरे रे रे रे……...किती ही मोठी लिस्ट? किती हे मेनु? कसे काय होणार? कसं काय मला जमणार? उद्या घरी पाहुणे, मित्रमंडळी येणार. चांगला पाहुणचार कसे मी निभावणार? पाहुणचार म्हंटल कि चांगल बोलणे, गप्पा गोष्टी करणे आणि मुख्यता चांगले खाणे पिणे पाहुण्यांकरिता.

वर्गीकृत शब्दावली - खाद्य पदार्थ शब्दकोश

उद्याचा दिवस आमच्या आयुष्यातला महत्वपूर्व दिवस आहे. त्याचे कारण असे की आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हा आनंदमई क्षण आम्ही आमच्या पाहुणे, मित्रमंडळी सोबत लुटण्याचा ठरविला आहे. पण दुसऱ्या बाजूला मला काहीतरी प्रश्न जाणवत होता. तो असा की जेवणामध्ये मेनु काय असणार? थोड्या विचाऱ्यानंतर मी असं ठरविले की उद्याच्या रात्रीच्या जेवणासाठी पनीर टिक्का, दम आलु, फिन्गर चिप्स, छोले, मसाला ताक आणि रोटी करायचे. आमचा संवाद समता समता मी आमच्या मिस्टरांना म्हंटले की मला एक रेसीपीचे बुक उद्या आणून द्या. तसे हे मेनु मी पहिला एकदा केले होते. पण मला आता विसरल्या सारखं जाणवत होत. बर, आता सगळ ठरवून झालं, मित्रमंडळी, पाहुणेपईकाना कळवलं. उद्याचा कार्यक्रम  व्यवस्थित झालं की बर. असे विचार करत मी झोपी गेले.

चिव चिव, काव काव, असा आवाज माज्या कानावर आला. उठुन पाहते तर पहाट झाली होती. रात्रीच्या कार्यक्रमाच्या विचाराने मी झटकन उठले. उठुन सकाळची सर्व कामे मी झटपट आवरून घेतले.  रिसेशनच्या काळामुळे मिस्टरांना आर्धा दिवसच सुट्टी होती. सकाळी न्हाहरीच्यावेळी मी आमच्या मिस्टरांना पुन्हा एकदा पुस्तकाचं आठवण करून दिले. म्हंटल की पहिला पुस्तक आणून देऊन मग ऑफिसला जा. कारण मला लागणाऱ्या सामानाची यादी करून बाजारातुन ते सर्व मला घेऊन यायचं होत. सकाळी नाष्ट्यानंतर माझे मिस्टर पटकन बाईकवरून मार्केट मधून कुठले तरी एक रेसीपीचे बुक आणले. आणि बाहेरूनच ऑफिसला लगेच निघून गेले.

चला, आता पुस्तक तरी मिळालं. आता काळजी मिटली असा विचार करत करत मी ते पुस्तक उघडुन पहिले. पाहते तर काय, पुस्तक तर रेसिपीचच पण रेसिपी इंग्लिश मध्ये. तसं मला थोडं फार इंग्लिश जमत पण रेसिपीमध्ये लागणारे पदार्थांची नावे अनोळखी  होती. जसे… Bay leaf, Cumin Seeds, Corriander leaves, Chickpeas, Cinnamon, Penuts etc.

आता तुमच्या ध्यानी मनी आले असेल की ह्या आर्टिकलची सुरवात मी अ रे रे रे ह्या शब्दात का केलं. माझ्या बाबतीत माझ्याकडे माझ्या ह्या समस्याला दुसरा पर्याय होता. तो म्हणजे “इंग्लिश -मराठी “शब्दकोश . पण त्यामध्ये सर्व शब्दाचे अर्थ मिळतीलच असे काही नाही. तर  तिसरा पर्याय आम्ही कोणता शोधावा? उत्तर सोपे आहे ते म्हणजे ” इंटरनेट” आज कल इंटरनेटवर सर्व प्रकारचे प्रश्नांचे उत्तरे मिळतात. इंटरनेट इतकं मोठ आहे की त्यामध्ये आपल्याला लागणारी माहिती शोधनं एक कला आहे. ते सर्वाना जमणार असे नाही. अशा विचाराने मला असे वाटले की आमच्या दीपजीवनीच्या वाचकांना मदत होईल असं काहीतरी करावं. असाच विचार करत करत आमचा दिवस कधी संपला ते कळलंच नाही. मी हे सारे पकवान अगदी व्यवस्थित पणे केले. आणि ते सर्व पकवान सर्वाना खूप आवडले. सर्वांनी माझे कौतुक केले. ते ऐकून मला खूप आनंद झाला. पण ह्या आनंदाचा श्रेय फक्त माझाच नसून तो आहे इंग्लिश -मराठी शब्दकोशाचा. शेवटी माझ्या मनात असा विचार आला की असाच आनंद आपल्या दीपजीवनीच्या वाचकांना घेता यावा म्हणून मी आमच्या दीपजीवनीमध्ये वर्गीकृत शब्दावली (शब्दकोश )असा हा नवीन भाग केला आहे. ह्या शब्दकोशाचा विभाग तुम्हा सर्वाना नक्कीच आवडेल आणि उपयोगी ठरेल अशी मी कल्पना करते. तरी तुमचे प्रतिक्रिया व सूचना कमेंट्स द्वारे आम्हास कळवा.

Cereals and Etables ||खाद्य पदार्थ

 

Black gram उडीद डाळ
Barley जव
Broth रस्सा
Buck-wheat मठ
Chick peas काबुली  चणे
Corn मका
Comfit सुका  मोरंबा
Curry कढी
Coffee कॉफी
Chatney चटणी
Chiwda चिवडा
Corn-ear कणीस
Dry white beans पांढरा वाटाणा
Dry coconut सुके खोबरे
Flour कणीक
Field pea वाटाणा
Feast मेजवानी
Gram dal हरभरा  डाळ
Green gram मुगाची  डाळ
Gram flour डाळीचे पीठ
Grain धान्य, दाणा
Gram चणे
Gruel दलिया
Gum acacia बाभळीचा गोंद
Honey मध
Ice बर्फ
Jaggery गूळ
Jam मोरंबा
Kidney beans राजमा
Lentil मसुराची  डाळ
Loaf पाव
Millet बाजरी, ज्वारी
Meat मटण
Oat ओट  धान्य
Oil तेल
Peanut or ground nut शेंगदाणे
Puff rice चुरमुरे
Pickle लोणचे
Pulse डाळ
Red gram तूरडाळ
Rice तांदूळ
Refined flour मेदा
Rice flakes पोहे
Semolina रवा
Sago साबुदाणा
Sugar साखर
Sauce सॉस
Sugar-candy साखरेची गोळी
Syrup सरबत
Tea चहा
Treacle साखरेचा पाक
Tomato ketchup टोमटो  केचप
Vermicelli शेवया
Vinegar व्हिनेगर , शिरका
Wheat गहू
Arrowroot अरारूट

SPICES||मसाले

Asafetida हिंग
Aloe कोरफड
Amber तैलस्फटिक 
Acid आम्ल
Alum तुरटी
Alkali क्षार
Arsenic सोमल
Aniseed बडीशेप
Black papper or paper corn मिरे
Bay leaf तमालपत्र
Basil तुळस
Betel-nut सुपारी
Borax टांकनखार
Coriander seeds धने
Cloves लवंगा
Cinnamon दालचिनी
Cardamoms मोठे मसाला
Cardamoms (green) हिरवे वेलदोडे
Brown वेलदोडे
Caraway seeds शहाजिरे
Catechu काथा
Camphor कापूर
Cocain कोकेन
Chalk खडू
Cumin seed जिरे
Cassia एक प्रकारची दालचिनी
Chrome alum लाल तुरटी
Dry ginger सुंठ
Fenugreek मेथी
Ginger आल
Garlic लसून
Linseed अळशी
Liquorice ज्येष्ठीमध
Mustard seeds मोहरी
Mace जायपत्री
Mango powder आमचूर
Musk कस्तूरी
Menthol पुदिना
Nutmeg जायफळ
Nitre सूर्यखार
Opium अफू
Origanum शिकाकाई
Parsley ओवा
Poppy seeds खसखस
Pomegranate seeds अनारदाणा
Parsley अजमोदा
Phyllanthus emblica आवळा
Red chilly powder तिखट
Ruddle गेरू
Resin राळ
Salt मीठ
Sesame seeds तीळ
Saffron केशर
Sulphur गंधक
Sandal चन्दन
Soap-nut रीठा
Salt petre सोरामीठ
Senna सोनामुखी
Turmeric हळद
Vitriol मोरचूद
Vinegar शिरका
Yeast यीस्ट    
Land caltrop गोकरू

VEGETABLES||भाजीपाला

Amaranthus चवळी
Brinjals वांगे
Bottle ground दुधी भोपळा
Broad beans वालपापडी
Bitter gourd कारले
Betel पान
Curry leaves कढीलिंब
Coriander leaves कोंथिबीर
Coconut नारळ
Cabbage पानकोबी
Cauli flower फुलकोबी(फ्लावर )
Carrots गाजर
Capsicum भोपळी मिरची
Cucumber काकडी
Cluster beans गवार
Colocasia अळूची पाने
Cashewnut काजू
Drum sticks शेवग्याच्या शेंगा
French beans श्रावण घेवडा
Green chillies हिरव्या मिरच्या
Green peas मटार
Groundnut भुईमुग
Knolkhol कोबी
Lady’s finger भेंडी
Mini leaves पुदिना
Mushroom मशरूम
Onion कांदे
Potatoes बटाटे
Red pumpking तांबडा भोपळा
Raddish मुळा
Sweet potatos रताळी
Spinach पालक
Spring onions कांधाची  पात
Sugar beet बीट
Yam सुरण

Fruits and Dry Fruits||फळे

 

Apple सफरचंद
Almond बदाम
Banana केळे
Black berry जांभूळ
Cashewnut काजू
Cherry चेरी
Crab apple रानटी सफरचंद
Fig अंजीर
Guava पेरू
Grape द्राक्षे
Jack-fruit फणस
Lime लिंबू
Lemon लिंबू
Mango आंबा
Musk melon खरबूज
Mosambi मोसंबी
Orange संतरे
Pineapple अननस
Pomegranate डाळिंब
Peach पीच
Pistachio पिस्ते
Raisins बेदाणे
Suger-cane ऊस
Sapodilla चिकू
Sultana or currants (Raisin) मनुका 
Tamarind चिंच
Walnut अक्रोड
Water melon टरबूज
Date खजूर

Milk Made Products||दूधापासून बनलेले पदार्थ

 

Cottage Cheese पनीर
Curd दही
Butter लोणी
Whale Dried Milk खवा
Clarified Butter तूप
Cheese चीस
Milk दूध
Cream मलई

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


मराठी कट्टा पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)

 संता : मला   वाटतं,  ती  तरुणी  बहिरी  आहे .

 बंता : तुला  कसे  माहीत ?

 संता : मी  आता  तिच्यासमोर  माझे  प्रेम  व्यक्त  केले,  तर  ती  म्हणते  कालच  नवीन  चप्पल  खरेदी केलेय.

शाळेला  आग  लागलेली  असते.  आता  आपल्याला  शाळेत  यावे  लागणार  नाही,  या  आनंदात  विध्यार्थी असतात . पण  एकच  विधार्थी  उदास  असतो .

शिक्षक: तू  उदास  का  आहेस ?

विधार्थी : सर , मला  प्रश्न  पडलाय , इतक्या  मोठ्या  आगीतून  तुम्ही  जिवंत  कसे ?

 बाबा : तू  आईशी  इतका  आवाज  चढवून  कसा  बोलू  शकतोस ?

 चिंटू: बाबा , तुम्हाला  कमीपणा  वाटतोय  का ?

 बाबा : का  बर ?  अस  का  म्हणतोस ?

 चिंटू: तुम्ही  मोठ्या  आवाजात  बोलू  शकत  नाहीत  ना?

भिकारी : साहेब ,  मला  १५०  रुपये  द्या . माझ्या  परिवाराला  भेटायचं  आहे……..

साहेब : कुठे  आहेत  तुझे  कुटुंब ?

भिकारी : मल्टीप्लेक्समध्ये  सिनेमा  बघत  आहेत .

पत्नी: लवकरच  आपण  दोनाचे  तीन  होणार  आहोत .

पती : ही  बातमी  ऐकून  मला  खूप  आनंद  झाला .

पत्नी : माझी  आई  आज  रात्रीच्या  विमानाने  येणार  म्हणून  तुम्हाला  इतका  आनंद  झाला …..?

एक  विधार्थी  अचानक  क्लासमधून  उठून  चालत  बाहेर  जाऊ  लागला .

प्राध्यापक: क्लास  सुटायच्या  आत  हा  बाहेर  कुठे  चाललंय?

विधार्थी: सर, त्याला  झोपेत  चालायची  सवय  आहे.

हुदयाच्या  ऑपरेशनला  बायपास  का  म्हणतात ?

कारण  ऑपरेशन   ठीक  झाल  तर  पास, नाही  तर  बाय ……..?

पती: डार्लिंग…… माझा  पगार  आपल्याला  पुरेसा  आहे  ना ?

पत्नी : ह,  माझ्यासाठी  तो  कसाबसा  पुरवून   घेईन  पण  तुमचं  काय ?

परीक्षक:   मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  काय ?

विधार्थी:  मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  सर्फ  एक्सेलचा  नवीन  प्रकार,  ज्याचा  वापर  कॉम्प्युटर  धुण्यासाठी  केला  जातो .

 

Hope you liked “मराठी कट्टा-पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: