Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

डोळ्यांच्या काळजीसाठी घरगुती उपाय

Deepjeevani Tips Home

 

डोळ्यांच्या काळजीसाठी

1.  डोळे सुरक्षित राखण्यासाठी गाजर, टोमाटो, पालेभाज्या, बदाम, खावेत. मोडाची धान्ये म्हणजे मूग, मटकी, हरभरे, यांना मोड आणून ती कच्ची खावीत.

2.  पसरट बशीत गार पाणी घेऊन त्यात एक चिमूट मीठ टाकावे व त्यात डोळ्यांची उघडझाप करावी.यामुळे डोळे स्वच्छ होतात.

3.  काकडी किसून किंवा चिरून फडक्यात गुंडाळून डोळ्यांवर ठेवावी.

4.  न तापवलेल्या दुधात कापूस भिजवून ठेवावा व रात्री झोपताना त्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवल्या, तर डोळ्यांना थंडावा येतो.

5.  तळपायांना साजूक तूप लावून काशाच्या वाटीने पाय चोळावेत. त्यातून सर्व उष्णता बाहेर पडते.

6.  एका घोट्या रुमालात चहाची पावडर बांधावी. ती गरम पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवावी व एक मिनिटाने काढून त्यावर बर्फ ठेवावा. असे आलटून पालटून करावे म्हणजे डोळ्यावर आलेली सूज एकदम कमी होते. दिवसातून थोडा वेळ डोळे मिटून स्वस्थ बसावे. त्यामुळे डोळ्यांना विश्रांती मिळते व ते तेजस्वी होतात.

7.  डोळे थकलेले असेल तर त्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

 

Advertisements

सावळ्या रंगाचे सोंदर्य घरगुती उपाय

Deepjeevani Tips Home

सावळ्या रंगाचे सोंदर्य

 1. सावळ्या त्वचेतही सोंदर्य खुलू शकते. रोज सकाळी अर्धा चमचा लिंबाच्या रसात मलई, डाळीचे पीठ, अर्धा चमचा संत्र्याच्या सालांची पावडर मिसळून चेहऱ्यावर लावा.
 2. नेहमी हलक्या नैसर्गिक रंगाचे कपडे घालावे. आठवड्यातून एकदा जैतुनाच्या तेलाने मॉलिश करा. यानंतर चेहऱ्यावर बर्फ घसा. त्वचा मुलायम होईल.
 3. तांदूळ आणि मसुराची डाळ कुटून टोमॅटोच्या गरामध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा.दहा मिनिटे हलक्या हाताने रगडा, थंड पाण्याने चेहरा धुवा, मेकपची गरज भासणार नाही आत्मविशवासाने आपले रूपही आणखी खुलेल.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


इडली -IDLI or IDALI Recipe

Click here to check IDLI recipe in English 

इडली -IDLI or IDALI

South Indian IDLIसाहित्य:-

 • २ वाटी उडदाची डाळ
 • ५ वाटी तांदूळ
 • मीठ
 • १ टेबलस्पून तेल
 • इडली पात्र

 

 

कृती:-

 1. इडली करायच्या आधी २४ तास उडदाची डाळ आणि तांदूळ निवडून धुवून भिजत घालावी.
 2. १०-१२ तास डाळ,तांदूळ भिजले की पाणी काढून मिक्सरवर वेगवेगळे वाटावे व एकत्र करून हाताने मिसळून एका ऐल्युमिनियमच्या डब्यात किंवा भांड्यात घालून उबदार जागेत ठेवावे.
 3. हिवाळ्यात २४ तास पीठ आंबल्यावर (उन्हाळ्यात १२ तासात पीठ आंबते)ते डब्यातून काढून त्यात १ चमच्या तेल व चवीपुरते मीठ घालून सारखे करावे.
 4. नंतर इडली पत्राला तेल लावून त्यात प्रत्येक साच्यात थोडे-थोडे पीठ टाकून इडल्या कराव्यात. आठ ते दहा मिनिटे त्याला वाफ आणावी .
 5. १० मिनिटांनी झाकण काढून इडली शिजली का ते पाहावे. मधोमध ओली सुरी टोचली व सुरीला पीठ लागले नाही तर समजावे इडली झाली.सुरीला पीठ लागले तर अजून ५ मिनिटे उकडण्यास ठेवावे.
 6. वरील साहित्यात २५-२६ इडल्या होतात. सांबार व चटणीबरोबर ४ व्यक्तींना भरपूर पुरतात.

टीप:-

 • इडलीचे पीठ चांगले आंबले की इडल्या चांगल्या हलक्या होतात. सोडा वापरायची जरूर नसते पण खूप थंडीच्या दिवसात २४ तास पीठ ठेवूनही आंबले नाही तर पिठात अर्धी वाटी आंबट दही व पाव चमचा सोडा घालून फेटून इडल्या कराव्यात.

 

Click here to check  IDLI recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


भारतीय पाककृती – ब्रेड पकोडा

BreadPakoda3

BreadPakodaसाहित्य :-

 • ८ ब्रेड स्लाईस
 • ३-४ मध्यम बटाटे
 • १ कप बेसन
 • १ कप पाणी
 • १/२ टीस्पून हळद
 • १/२ टीस्पून जिरे
 • १ टीस्पून तिखट
 • चिमुटभर खायचा सोडा
 • मीठ
 • कढीपत्ता
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर
 • आलं लसुन पेस्ट
 • तळण्यासाठी तेल

कृती :-

 1. बटाटे शिजवल्यावर लगेचच भाजी बनवावी म्हणजे बटाटे चांगल्याप्रकारे मॅश होतात. किवा बटाटे सुरीने खूप बारीक कापावेत.
 2. बटाट्याची भाजी करतेवेळी एका कढईत थोडे तेल घालून त्यात जिरे, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, आलं लसुन पेस्ट घालून परतावे.नंतर त्यातमध्ये थोडी हळद, व मीठ घालून परतावे.नंतर त्यात बारीक चिरलेले बटाटे घालून आणि बारीक चिरलेली कोंथिबीर घालून परतावे.
 3. एका बाऊल मध्ये बेसन घेऊन त्यात हळद,तिखट, जिरे, मीठ, खायचा सोडा, आलं लसुन पेस्ट, बारीक चिरलेली कोंथिबीर, आणि पाणी घालून पीठ भिजवावे.हे पीठ पातळ ही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे.
 4. एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर सुरीने त्रिकोणी आकाराचे तुकडे करावेत. नंतर एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरावी .त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा.
 5. तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे. बटाटा भाजी घातलेली ब्रेडचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मिडीयम हाय गॅसवर गोल्डन रंगावर तळून घ्यावेत.
 6. सर्व्ह करताना पुदिना चटणी,किवा टोमॅटो केचपबरोबर द्यावे.

टीपs :-

 1. बटाट्याची भाजी उरली असेल तर या पिठात भाजी घालून भजीप्रमाणेच तळाव्यात.
 2. जर प्लेन पकोडे बनवायचे असतील तर बटाट्याची भाजी करू नये फक्त ब्रेडचे कापलेले तुकडे भिजवलेल्या पिठात बुडवून नेहमी सारखे तळावे.
तर काय मंडळी, बनवणार का ब्रेड पकोडा…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to check Bread Pakoda Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


विनोदी किस्से – परीक्षेचा निकाल !!

बाबा मुलगा मराठी विनोद

कसा वाटला ” विनोदी किस्से – परीक्षेचा निकाल “..? नक्की कॅमेंठ्स करा व शेर करा

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: