गायीचे दूध

शिक्षिका :- गायीबद्दलची सर्व माहिती समजली का?
विध्यार्थी :-” हो मॅडम !”
शिक्षिका :- राघू, सांग बर गाय आपल्याला दूध का देते?
राघू :- कारण, तिला दूध कसं विकतात याचं ज्ञान नसतं.
आणखी वेळ
गणू :- मी वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. तुझे शब्द मागे घे.
विनू :- नाही घेत जा !
गणू :- तुला एक मिनिट वेळ देतो. विचार कर. नाहीतर…
विनू :- नाहीतर काय करशील.
गणू :- अजून थोडा वेळ देईन.
इमर्जन्सी
पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो.
पोपट :- हलो एक इमर्जन्सी आहे, जरा लवकर या.
पोलीस :- कोण तुम्ही? काय झाले?
पोपट :- अहो घरात मांजर शिरलंय.
पोलीस :- मांजर शिरलंय ही इमर्जन्सी होऊ शकते का?
पोपट :- अहो मी पोपट बोलतोय, मी घरात एकटाच आहे!
कुठे होतो?
वर्गात तास सुरु झाल्यावर शिक्षकांनी कालचा अर्धा राहिलेला धडा शिकविण्यास सुरवात केली आणि विचारले, काल आपण कुठे होतो?
एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, याच वर्गात.
यशस्वी होण्यासाठी
मुलगा उन्हात उभा राहून पुस्तक वाचत असतो,
आई :- अरे उन्हात का उभा आहेस?
मुलगा :- बाबाच म्हणाले, घाम गाळल्याशिवाय यश मिळत नाही !
You may also interested in,
To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here
Like this:
Like Loading...