Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Category: मराठी विनोद – मराठी जोक्स

आमचा कट्टा-हासाना जरा

शिक्षक – भारतात  सगळ्यात  जास्त  पाऊस  कुठे  पडतो?

बराच  वेळ  विचार  करून  बंड्याने  उत्तर  दिले,

“जमिनीवर!!”

गावात  वीज  येणार  असल्या  मुळे  सगळे  लोक नाचत  होते …… त्यात  एक  कुत्रा  हि  नाचत

होता…. लोकांनी  विचारले  ” तू का खुश आहेस ? ” ………

त्यावर  कुत्रा  म्हणाला  ” वीज येईल तर खांब पण लागतील ना” !!!!!!! 🙂

गब्बर : ” ये  हात  मुझे  दे  दे  ठाकूर…”

ठाकूर  (वैतागून) : घे,  माझे हाथ घे,  विरू चे हात घे,  जय चे हात घे,  बसंतीचे पण हात घे…सगळे  हात  गोळा  कर आणि  दुर्गा  माता  बन…

गब्बर : माफ  कर  यार,  तू  तो  senti  हो  गया ….

संता : अरे  मी  password  टाकला  कि  तिथे  asterisks  का  दिसतात?

Engineer : ते  सुरक्षेसाठी  आहे,  म्हणजे  जेव्हा  कोणी  तुमच्या  मागे  उभा  असेल  तेव्हा  त्याला  तुमचा  password दिसणार  नाही..

संता : काही  पण,  फसवायची  काम.. अरे  माझ्या  मागे  कोणी  उभा  नसतो  तेव्हा  पण  asterisks  दिसतात..

परीक्षेच्या  RESULT  नंतर:

जर  चांगले  गुण  मिळून  पास  झाला  तर…

शिक्षक:  मी  शिकवलंय  म्हणून

आई:  सगळी  देवाची  कृपा

बाबा:  माझा  मुलगा  आहे,  चांगले  मार्क्स  मिळणारच …

मित्र:  चल  यार,  जाऊन  एक  बिअर  मारू  आणि…

जर  नापास  झाला  तर….

शिक्षक: क्लास  मधे  लक्ष  देत  नाही

आई: हे  सगळं  मोबाईलमुळे  झालंय

बाबा: तुझाच  मुलगा  आहे,  लाडाने  डोक्यावर  बसवून  ठेवलंस .

पण  मित्र:  चल  यार,  जाऊन  एक  बिअर  मारू  खरंच….

सगळे  बदलतात  पण  मित्र  नाही.

शंकर  देव  तपश्चर्येला  बसले  होते.  तेवढ्यात  तिथे  माता  पार्वती  आली.  पहाते  तर

शंकर  देव  तपश्चर्या  करता  करता  गालातल्या  गालात  मंद  मंद  हसत  होते.  जेव्हा

थोड्या  वेळाने  शंकर  देव  तपश्चर्येवरुन  उठले  पार्वतीने  विचारले,

” महादेव.. आपण  तपश्चर्या  करतांना  गालातल्या  गालात  मंद  मंद  का  हसत  होतास?”

” अगं  काही  नाही … हा माझ्या  गळ्यातला  साप  गुदगुल्या  करीत  होता”

आजोबा – अरे  बन्या  जरा  माझी  कवळी  आण.

बन्या – अहो  आजोबा  अजून  स्वयंपाक  झाला  नाहीये!!

आजोबा – माहितीये रे…….

… समोरच्या  गोखले  आजींना  स्माईल  द्यायची  आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

एकदा  नवरा  बायको  Discovery  बघत  असतात.

channel  वर  म्हैस  दिसते….

नवरा  बायकोला : ती  बघ  तुझी  नातेवाईक

.

….

.

.

.

.

.

.

.

बायको :  Aiyyaaaaaa…

सासूबाई !!!!!

घोर  कलियुग –

एक  मुलगा  बस  स्टॊपवर  एका  मुलीला  छेडतो.

मुलगी –  तुझ्या  घरी  आई- बहीण  नाहीयेत  का?

…मुलगा –  नाही.

.

.

.

.

मुलगी – मग  चल  ना  तुझ्या  घरी  जाऊ, इथे  काय  टाईमपास  करतोयस!!!!!!!

मुलगा – बाबा  माझ्या  वर्गातला  एक  मुलगा  मला  gay  असं  चिडवतो.

बाबा – मग  २  सणसणीत  कानाखाली  दे  ना  त्याच्या.

.

.

….

.

.

.

मुलगा – नको  बाबा,  तो  फ़ार cute आहे!!!!!!!!!!

भाडेकरू:- अहो  मालक  रात्री  घरी  उंदीर  खूप  नाचतात  हो …!

.

.

.

.

….

घरमालक:- अरेSSS…..!१५०  रुपये  भाड्याच्या  खोलीत  मग  काय  सुरेखा  पुणेकर  नाचवू  का!?!?!!!!!

पत्रकाराने  एका  जखमीला  विचारले, ” जेव्हा  बॉंम्ब  पडला  तेव्हा  तो  फुटला  होता  का?”

जखमी  रागाने  म्हणाला, ” नाही…….बॉम्ब  रेंगत  रेंगत  माझ्याजवळ  आला  आणि  प्रेमाने  म्हणाला

.

.

….

.

.

.

.

.

“धप्पा”!!!!!!!!

बायको – अहो  ऐकलंत  का,  मला  वाटतं  आपली  मुलगी  कोणाच्यातरी  प्रेमात  पडली  आहे.

नवरा – कशावरून???

.

….

.

.

.

.

बायको –  अहो  आजकाल  ती  पॉकेटमनी  मागत  नाहीये.

एकदा  एक  मुलगी  एका  मुलाला  विचारते, ” आपल्याकडे  वजन,  उंची ,  अंतर ,  वेग  इत्यादी  मोजायला  युनिट्स आहेत.  पण  प्रेम,  मैत्री ,  आनंद  मोजायला  काहीच  नाहीये.  असे  का???????

मुलगा  थोडा  वेळ  विचार  करतो…….तिला  स्वतःच्या  कुशीत  घेतो  आणि डोळ्यात  डोळे  घालून  म्हणतो, ” हे बघ,

बोअर  करु  नकोस.”!!!!!!!!

हेडमास्तर-  का  रे  बंड्या  शाळेत  यायला  आज  उशीर  का  झाला?

बंड्या –  काय   करणार   बाईक   खराब   झाली   होती  सर.

हेडमास्तर – बस  ने  येता  येतं  नव्हतं  का  गधड्या???

बंड्या – मी  म्हटलं  होतं  सर  पण  तुमची  मुलगी  ऐकेल  तर  शप्पथ.

 

Hope you liked ” आमचा कट्टा-हासाना जरा”..? Lets like and share with your friends

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

माझ्या मना माझ्या मना हस की जरा

[कच्ची   बोर ]    

मोलकरीण :- ‘ डॉक्टरसाहेब,  ती  मुलं  पहा,  आपल्या  झाडावरची  कच्ची  बोर   खात   आहेत.’

डॉक्टर :- ‘ खाऊ  दे  त्यांना  ती  उद्या   येतीलच  आपल्याकडे.

[चुटकी]

शिक्षक (विध्यार्थीना) :-  सांगा  बघू,  आपण  नखं  का  वाढवू  नयेत?

एक  विध्यार्थी :- कारण  आपल्याला  चुटकी  वाजविता  यावी  म्हणून.

[आमंत्रण]

राजू :-  बाबा,  तीन  ठिकाणी  लग्नाचे  आमंत्रण  आहे,  आपण  कोणत्या  लग्नाला  जायचं?

बाबा :- ” कृपया   आहेर  आणू  नये,  असे  ज्या  पत्रिकेत  असेल  त्या  लग्नाला  जायचं.”

[पत्र]

नोकर :- ” साहेब,  तुमच्या   नावच  पत्र  आलं  आहे.”

साहेब :-  कुठल्या   मुर्खाला   मला   पत्र   लिहावंस  वाटलं?

नोकर :- “आपल्या   वडिलांना   साहेब!”

 [उतर]

शिक्षक :- ” बंडू  पेपर  लिहायचा  सोडून  कशाचा  विचार  करतोस.”

बंडू :- ” कुठल्या  प्रश्नाचे  उतर  कुठल्या  खिशात  आहे  याचा  विचार  करतोय सर.”

 [सूर्याचा  प्रवास]

अमित :- ” अजय,  मी  सूर्याकडे  जायचा  विचार  करत  आहे!”

अजय :- ” तू  विचार  करू  नकोस.  सूर्याकडे  जाईपर्यंत  तू  जळून  जाशील!”

अमित :- ” होय!  तुझं  बरोबर  आहे  पण  मी  रात्री  जाणार  आहे.”

  [कार  चोर]

न्यायाधीश :- तू  नवीन  कार  का  चोरलीस?

चोर :- ”  कार  स्मशानाबाहेर  उभी  होती,  मला  वाटलं  कारचा  मालक  मेला  आहे.”

 [जेवल्यानंतर  दोन  चमचे]

एकदा  एक  ग्राहक  हॉटेलमधून  जाताना  दोन  चमचे  घेऊन  जाऊ  लागतो.

नोकर :- तुम्ही  चमचे  का  नेत  आहात?

ग्राहक :- ” डॉक्टरांनी  सांगितलंय  कि जेवणानंतर   दोन   चमचे  घ्यायचे.”

 

Hope you liked “माझ्या मना माझ्या मना हस की जरा”

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


मराठी कट्टा-(विनोदी विश्व)

[गैरहजर ]

ऑफिसात  नेहमी  गैरहजर  राहिल्याच्या  कारणावरून  मॅनेजरने  मला  कामावरून  काढून  टाकले.

अरे  पण  तू काहीतरी  कारण  सांगायचं ! माझे  वडील  आजारी  होते. त्यांच्यासाठी मला  रोज  हॉस्पिटलमध्ये जाव  लागायचं.

तसं  शक्य  नव्हत ! का ?

कारण  माझे  वडिलच  तिथं  मॅनेजर  होते.

[येरे  येरे  पावसा ]

एक  माणूस  देवळात  येऊन  मूर्तीकडे  पाहून  पाऊस  पडायची  प्रार्थना  करतो.  ते  पाहून  पुजारी त्याला  विचारतो,

तू  शेतकरी  आहेस  का?

त्यावर  तो  माणूस  उद्गारतो, ” नाही  नाही,  माझं  छत्र्यांच  दुकान  आहे.”

[घड्याळ   समजत  नाही ]

राजू :- (नोकरास ) – ” उद्या  मला  सकाळी  सहाला  उठव,  मला  अभ्यास  करायचाय.”

नोकर :- ” पण  बाळ,  मला  घड्याळ  समजत  नाही.  तू  असं  कर,  सहा  वाजले  की  मला  सांग,  मी  तुला उठवीन.”

[शिकवण ]

सोनू :- “आमच्या  पोपटाचा  उजवा  पाय  ओढला  की  तो  ‘हेलो’’ म्हणतो  आणि  डावा  पाय  ओढला  की ‘गुडबाय’.

सोनू :- “अस्स”. मग  दोन्ही  पाय  एकदम  ओढले  तर?”

पोपट – (मध्येच) “अरे  मुर्खा,  मी  पडेन  की !”

[संगीत]

संगीत  शिक्षक  छोट्या  मुलाला  संगीत  शिकवताना  आरोहाची  संज्ञा   देताना  सांगतात.

” सा रे गा मा   मा  गा रे सा !”

मुलगा :- ” सारेगा  मारेगा  मामा !”

[उतर]

गुरुजी :- ” बंड्या  उठ,  चार  वन्य  प्राण्यांची  नावे  सांग.”

बंड्या :- ” एक  सिंह  आणि  तीन  वाघ.”

[सीट  नाही]

एका  विध्यार्थीने  कॉलेजात  प्रवेश  घेण्यासाठी  अर्ज  केला.  त्यावेळी  त्याचा  अर्ज  परत  करत  तेथील  कार्यालय प्रमुख   म्हणाला.

” माफ  करा.  तुम्हाला  प्रवेश  मिळू  शकणार  नाही.  आता  कोणती ही  सीट  रिकामी  नाही.”

” सर,  तुम्ही  मला  फक्त  प्रवेश  द्या,  सीटचा  बंदोबस्त  मी  स्वतः  करेन.  माझ्या  वडिलांचं  फर्निचरच  दुकान आहे.”

विध्यार्थी  लगेच  म्हणाला.

 

Hope you liked ” मराठी कट्टा-(विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


मराठी कट्टा पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)

 संता : मला   वाटतं,  ती  तरुणी  बहिरी  आहे .

 बंता : तुला  कसे  माहीत ?

 संता : मी  आता  तिच्यासमोर  माझे  प्रेम  व्यक्त  केले,  तर  ती  म्हणते  कालच  नवीन  चप्पल  खरेदी केलेय.

शाळेला  आग  लागलेली  असते.  आता  आपल्याला  शाळेत  यावे  लागणार  नाही,  या  आनंदात  विध्यार्थी असतात . पण  एकच  विधार्थी  उदास  असतो .

शिक्षक: तू  उदास  का  आहेस ?

विधार्थी : सर , मला  प्रश्न  पडलाय , इतक्या  मोठ्या  आगीतून  तुम्ही  जिवंत  कसे ?

 बाबा : तू  आईशी  इतका  आवाज  चढवून  कसा  बोलू  शकतोस ?

 चिंटू: बाबा , तुम्हाला  कमीपणा  वाटतोय  का ?

 बाबा : का  बर ?  अस  का  म्हणतोस ?

 चिंटू: तुम्ही  मोठ्या  आवाजात  बोलू  शकत  नाहीत  ना?

भिकारी : साहेब ,  मला  १५०  रुपये  द्या . माझ्या  परिवाराला  भेटायचं  आहे……..

साहेब : कुठे  आहेत  तुझे  कुटुंब ?

भिकारी : मल्टीप्लेक्समध्ये  सिनेमा  बघत  आहेत .

पत्नी: लवकरच  आपण  दोनाचे  तीन  होणार  आहोत .

पती : ही  बातमी  ऐकून  मला  खूप  आनंद  झाला .

पत्नी : माझी  आई  आज  रात्रीच्या  विमानाने  येणार  म्हणून  तुम्हाला  इतका  आनंद  झाला …..?

एक  विधार्थी  अचानक  क्लासमधून  उठून  चालत  बाहेर  जाऊ  लागला .

प्राध्यापक: क्लास  सुटायच्या  आत  हा  बाहेर  कुठे  चाललंय?

विधार्थी: सर, त्याला  झोपेत  चालायची  सवय  आहे.

हुदयाच्या  ऑपरेशनला  बायपास  का  म्हणतात ?

कारण  ऑपरेशन   ठीक  झाल  तर  पास, नाही  तर  बाय ……..?

पती: डार्लिंग…… माझा  पगार  आपल्याला  पुरेसा  आहे  ना ?

पत्नी : ह,  माझ्यासाठी  तो  कसाबसा  पुरवून   घेईन  पण  तुमचं  काय ?

परीक्षक:   मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  काय ?

विधार्थी:  मायक्रोसॉफ्ट  एक्सेल  म्हणजे  सर्फ  एक्सेलचा  नवीन  प्रकार,  ज्याचा  वापर  कॉम्प्युटर  धुण्यासाठी  केला  जातो .

 

Hope you liked “मराठी कट्टा-पोटभर हसा आणि हसवा (विनोदी विश्व)”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


चलां जरा हसू आणि हसवू (Some PJ’s)

वरप्रतिज्ञा

सासुरवाडी माझा देश आहे.

सासू-सासरे आणि त्यांचे सगेसोयरे हे माझे बांधव आहेत.

माझ्या बायकोवर माझे प्रेम आहे.

तिच्या घरातल्या विविधतेने नटलेल्या वस्तूंवर माझा डोळा आहे.

तिच्या वडिलांचा घरजावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या सासू-सासऱ्यांचा मान राखीन आणि इतर सर्वांशी तुसडेपणाने वागेन.

आपल्या कृत्यांनी सासू-सासऱ्यांना काशीयात्रेला जाण्यास प्रेरित करीन, अशी प्रतिज्ञा मी करीत आहे.

माझी बायको व माझ्या मेव्हण्या यांच्यातच माझे सौख्य सामावलेले आहे

जगातली सर्वात छोटी भयकथा

जगातला शेवटचा माणूस रात्री खोलीत एकटा असताना त्याच्या दरवाजावर ठक् ठक् झाली!!!!

वसई पूवेर्च्या उर्मट रिक्षावाल्याला (द्विरूक्तीबद्दल क्षमस्व) संताने विचारले, ”एव्हरशाइन सिटीला येतोस का?”

रिक्षावाला म्हणाला, ”चाळीस रुपये होतील.”

संता म्हणाला, ”दहा रुपये देतो.”

रिक्षावाला म्हणाला, ”दहा रुपयात कोण नेईल?”

संता म्हणाला, ”मागे बस. मी नेतो!!!!”

दारूने नशा होते…

नशेने उत्साह वाढतो…

उत्साहात मेहनत वाढते…

मेहनतीने पैसा वाढतो…

पैशाने इज्जत वाढते…

म्हणजेच…

इज्जत कमावायची असेल, तर दारू पिणे आवश्यक आहे!!!!

स्कॉच खरोखरच बेस्ट असते…

ती प्यायल्यावर प्रत्येक गोष्ट डबल दिसू लागते आणि पिणाऱ्याला आपण ‘सिंगल’च असल्यासारखे छान वाटू लागते!!

देवावर श्रद्धा ठेवा…

पण, घराबाहेर पडताना लॅच-कुलूप सर्व लावा!!!

पृथ्वीवर जन्माला आल्याचा एक तरी फायदा आहेच…

दरवषीर् सूर्याभोवती फुकट चक्कर मारायला मिळते!!!

प्रत्येक यशस्वी माणसामागे एक स्त्री असते…

आणि प्रत्येक अपयशी माणसामागे दोन असतात!!!

आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यांत फरक काय?

आपण आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला आत्मविश्वास…

आणि फक्त आपणच आपल्या गर्लफ्रेंडची पप्पी घेऊ शकतो, हा झाला अतिआत्मविश्वास!!!!

हॉलमधून धावत अर्जुन किचनमध्ये आला आणि अंजलीला म्हणाला, ”आई गं! बघ बघ! टीव्हीत बाबा सिक्सरवर सिक्सर मारतायत!”

अंजली म्हणाली, ”बेटा, नीट बघ. जाहिरात असेल ती!!!”

संता-बंता जंगलात गेले होते. समोरून अचानक वाघ आला. संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं माती फेकली आणि तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”

बंता हसत उत्तरला, ”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”

संता समुदात आंघोळीला गेला तेव्हा समोरून येणाऱ्या प्रचंड लाटेला ‘हो हो’ असे म्हणत लाटेखाली चिरडून वाहून का गेला?…

कारण लहानपणापासून आईने त्याला सांगितले होते, ”पाण्याला कधी नाही म्हणू नये!!!’

 

Hope you liked ” चलां जरा हसू आणि हसवू”..?

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: