पुरणपोळ्या पाककृती-खमंग मेजवानी
भारतीय पाककृती||पुरणपोळ्या
For More Visit: www.Deepjeevani.com
साहित्य :-
- ३ वाट्या हरभरा डाळ
- ३ वाट्या चिरलेला गूळ
- १ वाटी साखर
- अर्धे जायफळ, ५,६ वेलदोडे
- ३ वाट्या कणीक
- ३ टे.स्पून मैदा, चिमुटभर मीठ, पाऊन वाटी तेल, तांदळाची पिठी
कृती :-
- हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी.
- प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी.
- शिजलेली डाळ चाळणीवर उपसून पाणी काढून घेणे. ह्या पाण्याला पुरणाचा कट म्हणतात. पुरणपोळी बरोबर त्याचीच आमटी करतात. पुरणाचा कट काढल्याने पोळी हलकी होते.
- डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात घालून थोडी डावाने घोटावी. त्यात गूळ व साखर घालून शिजवायला ठेवावी.
- पुरण चांगले शिजले की पातेल्याच्या कडेने सुटू लागते. शिजवताना प्रथम पातळ होते व नंतर झाऱ्याला घट्ट लागू लागते.
- पुरणयंत्राला बारीक जाळीची ताटली लावावी व शिजलेले पुरण गॅसवरून उतरवून त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून गरम असताना पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.
- कणीक व मैदा चाळणीने चाळून घ्यावा व चिमुटभर मीठ, पाव वाटी तेल टाकून कणीक सैलसर भिजवावी.
- २ तास कणीक भिजल्यावर परातीत काढून पाणी लावून हाताने चांगली तिंबावी. पाण्याबरोबर वारंवार तेलाचा वापर करावा. कणीक चांगली मळून सैल झाली पाहिजे.
- वाटलेले पुरण हाताने सारखे करून घ्यावे. तांदळाची पिठी हाताला लावून कणकेचा छोटा गोळा हातावर घ्यावा. साधारण कणकेच्या गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे व उंडा हाताने बंद करावा
- पोळपाटावर पिठी घेवून हलक्या हाताने पोळी लाटावी व मंद आचेवर तव्यावर गुलाबी सारखे डाग पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.
तर काय मंडळी, बनवणार का गोड पुरणपोळ्या…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा |
You may also interested in,
- मराठी शुभेच्छा पत्रे
- मी मराठी/Me Marathi
- दीपजीवनी टिप्स–घरगुती उपाय/Deepjeevani Tips,
- मराठी कविता/Marathi Poems,
- मराठी विनोद/Marathi Jokes,
- वर्गीकृत शब्दावली (शब्दकोश )||Glossary
- आमचा भारत-आमची संस्कृती-रांगोळी
- मराठी म्हणी
To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here