Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Category: पाककृती-खमंग मेजवानी

झटफट उपमा रेसिपी नाष्ट्यासाठी – उप्पीटची रेसिपी

Click here to see Upma or Uppit recipe in English

झटफट उपमा रेसिपी

झटफट उपमा रेसिपी नाष्ट्यासाठी

साहित्य :-

  • २ वाट्या जाड रवा
  • २ मोठे कांदे बारीक चिरून
  • १ मोठा बटाटा
  • १ टोमॅटो [opational ]
  • ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • १०-१२ कढीलिंबाची पाने
  • ३-४ लाल सुक्या मिरच्या
  • मीठ
  • साखर चवीनुसार
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • १ चमचा साजूक तूप
  • अर्धा वाटी खोवलेला ओला नारळ
  • कोंथिबीर बारीक चिरून
  • फोडणीकरता मोहरी, जिरे, हिंग

कृती :-

  • कढईत मंद आचेवर रवा गुलाबी रंगावर भाजून काढून ठेवावा.
  • पातेलीत ४ वाट्या पाणी उकळायला ठेवावे.
  • एका जाड बुडाच्या पातेलीत ३ टेबल स्पून तूप घालावे व तूप तापल्यावर मोहरी,जिर व हिंग घालून फोडणी करावी. त्यात कढीलिंब , सुक्या मिरच्या टाकून कांदा व बटाटे टाकावेत. व मिरची टाकावी व दोन वाफा येऊ द्याव्यात .
  • बटाटे शिजले की भाजून ठेवलेला रवा टाकून थोडे परतावे. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. १ टोमॅटो आवडत असल्यास चिरून टाकावा.
  • गॅस मंद करून रव्यात उकळलेले चार वाट्या पाणी थोडे घालत रवा सारखा ढवळावा, गुढळी न होता रवा चांगला फुलून आला पाहिजे.
  • सर्व पाणी घातल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा द्याव्यात.
  • तयार उपम्यावर खोबरे, कोंथिबीर घालून खाण्यास द्यावा.

टीप:-

  • उपमा तयार झाल्यावर १ चमचा साजूक तूप सोडावे. स्वादिस्त लागतो.
  • उपम्यात आवडत असल्यास फोडणीत १ चमचा उडदाची डाळ, १ चमचा हरभळा डाळ व मिठ्भर काजू घालावा. उपमा छान लागतो.
तर काय मंडळी, बनवणार का झटपट उपमा …? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Upma or Uppit recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

कोथिंबिरीचे वडे – सरळ सोपी रेसिपी

Click here to see Kothimbir Wade recipe in English

कोथिंबिरीचे वडे

Kothimbirchya Vadya

साहित्य :-

  • २ जुड्या कोंथिबीर
  • १ टे. स्पून तिखट
  • ५-६ लसुन पाकळ्या
  • १ इंच आले बारीक वाटून
  • १ वाटीभर डाळीचे पीठ
  • २ टेबलस्पून बारीक रवा
  • मीठ
  • पाव चमचा हळद
  • चिमूटभर हिंग
  • चिमूटभर सोडा
  • तळण्याकरता तेल

कृती :-

  • कोंथिबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे.
  • एका परातीत कोरडी झालेली कोंथिबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, तिखट, आले, लसुन पेस्ट, हळद, हिंग, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे.
  • कढईत तेल तापवून तयार पीठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.

टीप :-

  • कोंथिबीर पेक्षा हरभरा डाळीचे पीठ जास्त नको. भिजवलेल पीठ सैलसर हवे.
  • डाळीच्या पिठाबरोबर बारीक रवा घातल्यास वडे छान फुलून येतात.

 

Click here to see Kothimbir Wade recipe in English

You may also interested in,

 

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


मुंबई स्पेशल बटाटा वडा

Click here to see Batata Vada recipe in English

बटाटे वडा

Batata Vada साहित्य  :-

  • अर्धा किलो बटाटे
  • १ वाटी डाळीचे पीठ
  • १ टे.स्पून तिखट
  • मीठ
  • पाव चमचा हळद
  • चिमूटभर सोडा
  • २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन
  • १ गड्डी लसून सोलून
  • १ इंच आले
  • ६-७ हिरव्या मिरच्या
  • ८-१० कढिलिंब
  • १ लिंबाचा रस
  • कोंथिबीर बारीक चिरून
  • १/२ टेबलस्पून मोहरी
  • चिमूटभर हिंग
  • तळण्याकरता तेल

 

कृती :-

  • बटाटे उकडून, साल काढून सुरीने बारीक चिरावेत.
  • आले, लसून,मिरच्या बारीक वाटून बटाट्याच्या फोडींवर घालाव्यात. लिंबाचा रस, मीठ व कोंथिबीर घालावे.
  • २ चमचे तेलाची, मोहरी, हिंग,हळद,कढिलिंब घालून फोडणी करून बटाट्याच्या सारणावर घालावी.
  • सारण हलक्या हाताने कालवून त्याचे सारखे गोळे करावेत.तळहातावर थोडे चपटे करून ताटाला तेल लावून त्यावर लावून ठेवावेत.
  • डाळीचे पीठ, मीठ, तिखट,हळद घालून सरसरीत भिजवावे.त्यात चिमूटभर सोडा व २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून नीट कालवून घ्यावे.
  • पसरट कढईत तेल तापायला ठेवावे. तेल तापल्यावर एक एक वडा पिठात बुडवून तळावा. अशा रीतीने सर्व वडे तळावेत.

 

तर काय मंडळी, बनवणार का मस्त बटाटा वडे …? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Batata Vada recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

 


कुरकुरीत कांदा भजी-खेकडा भजी

Click here to see Kaanda Bhaji or Pyaaz ka Pakoda recipe in English

कांद्याची  भजी (खेकडा भजी)

कुरकुरीत कांदा भजी_खेकडा भजीसाहित्य :-

  • ५-६ मोठे कांदे
  • २ वाट्या डाळीचे पीठ
  • २ टेबलस्पून तांदळाची पिठी
  • २ चहाचे चमचे तिखट
  • अर्धा चहाचा चमचा हळद
  • ४ टेबलस्पून तेल
  • चवीनुसार मीठ
  • १/२ चहाचा चमचा जिरे पावडर [optional ]
  • १/२ चहाचा चमचा धने पावडर [optional ]
  • १/२ चहाचा चमचा ओवा
  • कोंथिबीर बारीक चिरून
  • भजी तळण्याकरता तेल

 

कृती :-

  • कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत . त्यावर मीठ घालून हाताने थोडे कालवून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे.
  • १०-१५ मिनिटांनी कांद्यावर डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, ओवा, जिरे पावडर, धने पावडर, चार टेबलस्पून तेल गरम करून घालावे आणि चिरलेली कोंथिबीर घालून हलक्या हाताने मिसळावे .
  • कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कांदा हाताने मोकळा करून वेड्यावाकड्या आकाराची भजी घालावीत व खरपूस तळून काढावीत.
  • गरम गरम खायला द्यावेत.

 

टीप :-

  • ही भजी जरा झणझणीत चांगली लागतात.आवडत असल्यास २-३ मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.
तर काय मंडळी, बनवणार का झटपट कांद्याची  भजी (खेकडा भजी )…? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Kaanda Bhaji or Pyaaz ka Pakoda recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


फोडणीचे पोहे-कांदा पोहेकांदे पोहे

Click here to see Kaande Pohe or Kaanda Poha recipe in English

फोडणीचे पोहे-कांदे पोहे

 

फोडणीचे पोहे-कांदे पोहेसाहित्य :-

  • २ वाट्या जाड पोहे निवडून घेणे
  • २ कांदे बारीक चिरून
  • ५-६ हिरव्या मिरच्या चिरून
  • ६-७ कढीलिंब
  • अर्धी वाटी खोवलेले खोबरे
  • मुठभर चिरलेली कोंथिबीर
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार साखर
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल
  • १/२ वाटी शेंगदाणे [optional ]
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • अर्धा चमचा हळद
  • १ मध्यम आकाराचा बटाटा
  • अर्धा कप वाटणे [मटार] [optional ]

 

कृती :-

  • कांदे चिरून, बटाटे चिरून, मिरच्या चिरून, कढीलिंब , कोंथिबीर चिरून, नारळ खवून, लिंबाचा रस काढून सर्व तयारी करावी.
  • भोकांच्या चाळणीत (रोवळीत) पोहे हलक्या हाताने धुवावेत.
  • पातेले तापत ठेवून तेल घालावे व तेल तापल्यावर मोहरी ,जिरे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी.
  • फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालून लगेच कांदा व बटाटा घालावा.
  • गॅस मंद करून कांदा व बटाट्यावर चिमूटभर मीठ व साखर घालून कांदा व बटाटाला १ वाफ द्यावी.
  • कांदा पारदर्शक झाल्यावर व बटाटा शिजल्यावर भिजवलेले पोहे घालावेत व लगेच चवीनुसार मीठ,साखर व अर्ध्या लिंबाचा रस घालून पोहे उलथण्याने चांगले ढवळावेत.
  • गॅस अगदी मंद ठेवून झाकण घालून दोन वाफा द्याव्यात व दोन वाफांमध्ये चांगले ढवळावे म्हणजे मीठ,साखर सर्व पोह्याला सारखे लागेल .
  • आवडीनुसार खोबरे,कोंथिबीर पोह्यात घालून नीट ढवळून खाण्यास द्यावे अथवा डिशमध्ये पोहे घालून खोबरे,कोंथिबीर घालून दिश सजवावी.

 

टीप:-

  • वरील पोह्यात मटारच्या दिवसांत वाटीभर मटार अथवा मूठभर भाजके दाणे घालून पण पोहे छान लागतात.
  • पोह्यात आवडत असल्यास १ मोठा टोमॅटो बारीक चिरून कांद्याबरोबर घालावा.  टोमॅटो मुळे पोहे ओलसर होतात व लिंबू घालायची जरूर पडत नाही.
  • चार्तुर्मासात कांदा घालायचा नसेल तर फ्लावर अथवा पानकोबी घालून उत्तम पोहे होतात.
  • पोहे जरा जास्त तेलात स्वादिष्ट होतात. पण कमी तेलात करायचे असतील तर कांदा परतण्याइतपत तेल घालावे व कांदा परतल्यावर पाव वाटी पाणी आधी फोडणीत घालून मग पोहे टाकावे. म्हणजे तेल कमी घालून सुद्धा मऊसर पोहे होतात.
  • पोह्यांवर ओला नारळ नसेल तर सुके खोबरे किसून घालून पोहे चांगले लागतात . खोबऱ्याचा कीस वापरायचा असेल तर मुठभर भाजके दानेपण वापरावेत.खमंग लागतात.
  • पोह्यावर डिशमध्ये खायला देताना बारीक शेव घालावा.त्यामुळे पोहे स्वादिष्ट लागतात.

 

तर काय मंडळी, बनवणार का झटपट फोडणीचे पोहे-कांदे पोहे…? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Kaande Pohe or Kaanda Poha recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: