Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Category: घरगुती उपाय

साधे सरळ घरगुती टिप्स

 

साधे सरळ घरगुती टिप्स

 

 • किरकोळ भाजल्यास नारळाची शेंडी जाळून त्याची राख खोबरेल तेलात  बुडवून बरेच दिवस लावावेत. डाग असलेला निघून जाईल.

 

 • जायफळ, रक्तचंदन व काळेमिरे उगाळून त्याचा लेप रात्री चेहऱ्यास लावा  व सकाळी धुऊन टाकावा. डाग दूर होतात.

 

 • डोकं दुखल्यास लिंबू लावावा. म्हणजे डोकं दुखणं कमी होईल. परंतु लिंबू  डोळ्यात जावू देऊ नये.

 

 • उन्हात जाऊन त्वचा काळपट झाल्यास टोमॅटोचा रस लावावा .

 

 • सर्दीने नाक गळत असल्यास हळदीचा धूर घेतल्यास नाक वाहने थांबते.

 

Advertisements

दीपजीवनी टिप्स-घरगुती उपाय

दीपजीवनी टिप्स-घरगुती उपाय

 • ओठांचे  सोंदर्य  वाढवून  त्यात  गुलाबीपणा  येण्यासाठी  रोज  मध  चोळावा  ओठांना  कोमलता  व लालिमा  येते.

 

 • वापरत  नसलेल्या  किंवा  जुन्या  नेकटायमध्ये  स्पंज  किंवा  कापूस  भरून  त्याचा  आकर्षक  सॉफ्ट` टॉय  प्रकारचा  सर्प  बनवता  येतो . उघडी  शिवण  शिवून  टाका . तोंड  व  डोळे  बटणानी  बनवा.

 

 

 • तुटलेले  नख  जोडण्यासाठी  ( डीप-डीप चहाच्या )  टी-बॅग्जच्या  कागदाचा  उपयोग  होतो . तुटलेल्या नखावर  छोटा  तुकडा  ठेवा  व  वरून  रंगहीन  नेलपॉलीशचे   ४-५  थर  घा  बस्स !!

 

 • अत्यंत  घाईच्यावेळी  गरमा-गरम  सूप  मुलांना  पिण्यासाठी  देताना  त्यात  बर्फाचे  २-३  क्युब्ज टाकल्यास   सूप  थंड  करण्याचा  वेळ  वाचतो.

उपयोगी घरगुती उपाय व टिप्स

उपयोगी घरगुती उपाय व टिप्स

 •  सोने , चांदी व धातूच्या  नेकलेसच्या  चेनचा  गुंता  झाला  तर  गाठीवर  तेलाचे  दोन – तीन  थेंब  टाका. दोन टाचण्याच्या   मदतीने ती  गाठ  सहज सोडवता  येते.

 • गिटारचा   पुष्ठभाग  चकचकीत  दिसावा यासाठी  त्यावर बोटाने टूथपेस्ट  चोळावी . सुकल्यावर  फडक्याने  घासून  स्वच्छ  करावे.

 • पाण्यात  थोडी साखर विरघळून घ्या व  त्यामध्ये सोन्याचे  दागिने  बुडवून  ठेवा . नंतर स्वच्छ  पाण्याने धुवा. दागिने  चमकू  लागतील.

 • ताजे  मटार  दाणे  उकडल्यावर  त्यावर  लगेच  थंड  पाणी  ओता.  त्याचा  हिरवा  रंग  आहे  तसाच  राहतो.

 • भजी  चांगली  कुरकुरीत  होण्यासाठी बेसनात  मोहन  न  घालता  तेवढेच  गरम  पाणी  घाला.

 • रात्री शांत  न  झोप  येणाऱ्यांनी  शांतपणे  झोप  यावी ,  यासाठी  झोपण्यापूर्वी एक  कप  गरम  व  गोड  दुध  प्यावे.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


माझे घर माझे घरगुती उपाय

माझे घर माझे घरगुती उपाय

 • छोटे  छोटे  कपडे  फारच  मळलेले  असतील  तर  साबण, सोडा  घालून  प्रेशर  कुकरमधून  शिट्टी  करून काढावेत. भट्टी  केल्यासारखे   घराच्या  घरी  स्वच्छ  होतात.

 • रंग  गेल्याने  फिकट  झालेली  जीन  पॅन्ट  नव्या  कोऱ्या  जीनच्या  पॅन्टबरोबर  धुलाई  मशीनमध्ये  धुतल्यास  नवीन  पॅन्टचा  रंग  जुन्या  फिकट  पॅन्टला  बसून  जुनी  पॅन्टही  छान  दिसू  शकते.

 • गॅसची  शेगडी  धुताना  दोन्ही  बर्नरवर  स्टीलच्या  वाट्या  पालथ्या  घालाव्यात .बर्नरच्या  छिद्रातून  पाणी , कचरा , साबण  आत  शिरणार  नाही  व  गंज  चढणार  नाही.

 • घरात  छान  फ्रेश  सुगंध  दरवळावा  असे  वाटत  असेल  तर ( विशेषत; स्वयंपाकात मासळी असेल तर)  एका भांड्यात  पाणी  उकळत  ठेवून  त्यात  संत्राच्या  साली  टाकाव्यात.

 • दोडक्याच्या शिरा ,लाल  भोपळ्याची साले, कोथिबिरीच्या  काड्या  टाकून  न देता तव्यावर परतवून त्यात मिरची, मीठ, साखर, तीळ, लिंबू  पिळून  हा  ठेचा  करावा. अत्यंत  चविष्ट  होतो.


घरच्या घरी घरगुती उपाय

घरच्या घरी घरगुती उपाय

 • थंडीची  सुरुवात  झाली  की त्वचा  कोरडी  होऊ  लागते  .गार  वारे  व  कोरडे  हवामान  यामुळे  त्वचेतील   मुलायमंपणा  कमी  होतो . कोरडा  व  रखरखीपणा  टाळण्यासाठी  क्रीमऐवजी  दुधाची  साय  लावावी. ग्लिसरीन  व लिंबूरस  एकत्र  करून  बाटलीत   ठेवावा  व  रोज  अंघोळीपूर्वी  त्वचेला  लावावा .अंघोळीसाठी  चुकूनही  अधिक गरम  पाणी  वापरू  नये . आंघोळीनंतर  हे  ग्लिसरीन  युक्त  लिंबू  मिश्रण  स्कीनवर  हलकेच  चोळावे . अशाप्रकारे  लोणी  वा  फळांचा  रस  लावून  त्वचेचा  तजेलदारपणा  टिकवण्यासाठी  उपाय  करावेत.
 • कपड्यावरील  घामाचे  डाग  जात  नाहीत  ,ही  प्रत्येक  गृहिणीची  समस्या  असते .कपड्यावरील  घामाचे  डाग दूर  करण्यासाठी  कपडे  भिजवताना  त्या  पाण्यात  आस्प्रिनच्या  दोन  गोळ्या  टाकाव्या.
 • मधाच्या बाटलीत  दोन  मिऱ्याचे  दाणे  टाकून  ठेवल्याने मध  बराच  काळ  चांगला  राहतो  व  मुंग्याही  लागत  नाही.
 • दह्यामध्ये  काळा  मसाला  मिसळून  डोके  धुतल्याने केस  स्वच्छ  आणि  मोकळे  होतात .शिवाय  केसांची वाढ  चांगली होते. केस  मऊ होतात.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: