Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Author: freedomadmin

मसाला पापड पाककृती- खमंग मेजवानी

Click here to see Masala Papad Recipe in English

मसाला पापड

 

 

MasalaPapad1साहित्य :-

 • ४ पापड
 • १ मोठा कांदा, बारीक चिरून
 • २ लहान टोमॅटो, बारीक चिरून
 • १ टिस्पून लाल तिखट
 • २ टिस्पून चाट मसाला
 • २ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
 • मीठ चवीनुसार
 • तेल, पापड तळण्यासाठी.

 

कृती :-

 • प्रथम एका बाउल मध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. नंतर बाजूला ठेवावे. ह्या मिक्शर ला मसाला पापाडचा टोप्पिंग म्हणू शकतो.
 • एका पनमध्ये पापड बुडण्याइतपर्यंत तेल गरम करावे. नेहमी प्रमाणे पापड तळून घ्यावे.
 • पापडावर चाट मसाला आणि लाल तिखट भुरभुरावे.
 • आता पापडावर मिक्स केलेलं टोप्पिंग पसरावा.
 • पुन्हा येगदा टोप्पिंग केलेल्या पापडावर चाट मसाला भुरभुरावे.
 • लगेच सर्व्ह करावे.

 टिप्स :-

 • मसाला पापड लगेच सर्व्ह करावे. कारण हा पापड कांदा आणि टोमॅटो असल्याने लवकर मऊ होतो.
तर काय मंडळी, बनवणार का चटपटा मसाला पापड…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Masala Papad Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

पावभाजी पाककृती- खमंग मेजवानी

Click here to see Pav Bhaji Recipe in English

-: पावभाजी :-

PavBhaji in Marathiसाहित्य:-

 • अर्धा किलो बटाटे उकडून
 • अर्धा किलो कांदे
 • पाव किलो टोमॅटो
 • १०-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आलं वाटून
 • १ चहाचा चमचा आमचूर पावडर, २ चहाचे चमचे पावभाजी मसाला
 • पाव किलो फुलकोबी(फ्लावर ) बारीक चिरून,पाव किलो भोपळी मिरची बारीक चिरून
 • २०० ग्रॅम मटार
 • अर्धी वाटी रिफाइंड तेल
 • १ चहाचा चमचा लाल तिखट, हळद, मीठ
 • १०-१२ पावभाजी ब्रेड, २०० ग्रॅम अमूल बटर.

 

कृती –

 • बटाटे उकडून सोलून बारीक कुस्करावे. शक्यतो स्मशरने बारीक करावे.स्मशर नसेल तर किसणीवर किसून घ्यावेत.
 • कांदे बारीक चिरावेत.
 • टोमॅटो बारीक चिरावा. आलं, लसूण वाटून घ्यावे.
 • कढईत अर्धी वाटी तेल गरम करावे. चिरलेल्या कांदातले अर्धे कांदे घालून कांदा खमंग परतावा.  कांदा परतल्यावर आलं, लसूण, मसाला, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून परतावे. त्यात बारीक चिरलेला फ्लावर व भोपळी मिरची, मटार घालून परतावे. फ्लावर व मटार शिजले की टोमॅटो घालून डावाने किंवा स्मशर घोटून घ्यावे. (फ्लावर मटार आधी थोडे वाफवून घेतले तरी चालते.)
 • वरील मसाल्यात बटाटे घालून घोटावे व २ वाट्या पाणी व चवीनुसार मीठ घालून चांगले शिजवावे.
 • पावभाजी ब्रेड मधोमध चिरून अमूल बटर लावून तव्यावर शेकावेत.
 • सर्व करायच्या वेळेला तळलेला ब्रेड बाजूला पावभाजीची गरम भाजी अमूल बटर घालून परतून वाढावी.
 • चिरलेला निम्मा कांदा व बारीक चिरलेली कोंथिबीर भाजीवर घालावी.

 

दक्षता –

 • पावभाजीच्या भाजीत गाजर, घेवडा वगैरे इतर भाज्या घालायला हरकत नाही.घालायच्या असल्यास अगदी बारीक चिरून वाफवून घालाव्यात.
 • भाजी संपूर्ण लोण्यात करायची असेल तर भाजी करायला म्हणजे कांदा वगैरे परतायला अमूल बटर वापरू नये. घरगुती पांढरे लोणी वापरून भाजी करावी व अमूल बटर नेहमी सर्व्ह करायच्या वेळेलाच वरती घालावे.
 • पावभाजीचा तयार मसाला वापरायचा नसेल तर ४-५ लवंगा, १ चमचा जिर, १ चमचा धने, १ चमचा काळे मिरे, २ हिरवे वेलदोडे, २ मोठे मसाला वेलदोडे बारीक कुटून त्याची पावडर मसाला म्हणून वापरावी. हा मसाला वापरला तर भाजीत वरील प्रमाणात लाल तिखट व आमचूर पावडर जास्त वापरावी.
 • वरील साहित्यात ५-६ माणसांना पोटभर पावभाजी होते.

 

तर काय मंडळी, बनवणार का पावभाजी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Pav Bhaji Recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


अंड्याची भूर्जी-अंडा भूर्जी

Click here to see Anda Bhurgi recipe in English

भारतीय पाककृती||अंड्याची भूर्जी

Anda Bhurgiसाहित्य :-

 • ४ अंडी
 •  २ मोठा  कांदा  बारीक  चिरून
 • १ मोठा  टोमॅटो बारीक  चिरून
 • २ हिरव्या  मिरच्या  बारीक  चिरून
 • मूठभर  चिरलेली  कोथिंबीर
 •  २ चमचा  तेल
 •  लाल  तिखट  अर्धा  चमचा
 •  अर्धा  चमचा  जिरे
 • चवीनुसार  मीठ

कृती :-

 • खोलगट  फ्राईंगपॅन  किंवा  कढईमध्ये  तेल  गरम  करावे. त्यात  जिरे  घालावे.  त्यात  बारीक  चिरलेला कांदा,  मिरची  परतून  घ्यावी.  कांदा  गुलाबी  झाला  की टोमॅटो घालून  परतावे.
 • एका  पातेल्यात  अंडी  हलकी  फेटून  घ्यावीत  व  परतलेला  कांदा  टोमॅटोवर  घालावा.  चवीनुसार  मीठ व अर्धा  चमचा  लाल  तिखट  घालून  ढवळावे.  ढवळून  अंडे  पूर्ण  कोरडे  झाले  की  कोथिंबीर  घालून उतरवावे.
तर काय मंडळी, बनवणार का अंड्याची भूर्जी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

Click here to see Anda Bhurgi recipe in English

You may also interested in,


साबुदाण्याची खिचडी – उपवासाचे खाद्य पदार्थ

Click here to see Sabudana Khichadi (Sago Khichadi) in English

 साबुदाण्याची  खिचडी

Sabudana Khichdiसाहित्य :-

 • २  वाट्या  साबुदाणा
 • २  वाट्या  दाण्याचे  कूट
 • अर्धा  चमचा जिरे
 • ५-६  हिरव्या  मिरच्या
 • १  मूठ  बारीक  चिरलेली  कोथिंबीर
 • १  वाटी  खवलेला  नारळ
 • २  टेबलस्पून   तेल
 • मीठ   चवीनुसार
 • साखर  चवीनुसार

कृती :-

 • साबुदाणा  चाळून  निवडून  स्वच्छ धुऊन  भिजवावा.  पातेल्यावर  झाकण  ठेवून  दोन  तास  ठेवावा.
 • साबुदाणा  भिजल्यावर  हाताने  मोकळा  करून  त्यात  दाण्याचे  कूट  २  वाट्या  घालावे.
 • हिरव्या  मिरच्या, चीमुठ्भर  जिरे  व  थोडी  कोंथिबीर  घालून  वाटून  साबुदाण्यात  घालाव्यात.  मीठ, साखर  चवीनुसार  घालून  साबुदाणा  हाताने  सारखा  करावा.
 • जाड  बुडाच्या  पातेल्यात  किंवा  कढईत  २  टेबलस्पून  तेलाची  फोडणी  करावी.  त्यात  पाव  चहाचा चमचा  जिरे  घालावे.
 • कालवलेला  साबुदाणा  तेल्याच्या  फोडणीवर  घालून  खिचडी  चांगली  परतावी.
 • गॅस  अगदी  मंद  करून,  पातेले  पातळ  असेल  तर  पातेल्याखाली  तवा  घालून  खिचडीवर  झाकण ठेवून  दोन  मंद  वाफा  येऊ  द्याव्यात.  आवडत  असल्यास  अर्धा  लिंबाचा  रस  घालावा.
 • वरून  खोबरं , कोथिंबीर  घालून  गरम  खिचडी  खाण्यास  द्यावी.

दक्षता :-

 • मिरच्या  वाटून  लावायच्या  नसतील  तर  फोडणीत  मिरच्यांचे  तुकडे  घालावेत.  पण  मिरची  कोंथिबीर  वाटून  लावल्याने  खिचडीला  रंग  छान  येतो.
 • साबुदाणा  भिजवताना  सर्व  पाणी  काढून  टाकून  पाव  वाटी  ताक  घालावे  म्हणजे  साबुदाणा  चांगला भिजतो  व  खिचडी  चवीला  पण  छान  लागते.  ताक  घातले  तर  लिंबू  घालायची  गरज  नाही.
तर काय मंडळी, बनवणार का साबुदाण्याची खिचडी …? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see  Sabudana Khichadi (Sago Khichadi) in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

 


मैसूर बज्जी पाककृती-खमंग मेजवानी

Click here to see Karnataka special Mysore Bajji -Mysore Bonda in English

भारतीय पाककृती||मैसूर बज्जी

Mysore Bajjiसाहित्य :-

 • १  वाटी  मैदा
 • १/४   वाटी तांदळाचे  पीठ
 • २  चमचे  रवा  [optional ]
 • १  कप  दही
 • २  हिरव्या  मिरच्या
 • १  चमचा  मीठ  चवीनुसार
 • १  चमचा  जिरे
 • ८-१०  कढीलिंब
 • १/२  इंच  आलं
 • १  कांदा
 •  चीमुठ्भर  सोडा
 •  तेल  तळण्याकरता
 •  १ वाटी खवलेला  नारळ

कृती :-

 • कांदा, आलं,  हिरव्या  मिरच्या,  कढीलिंब   हे  सर्व  बारीक  वाटून  घ्यावे.  आणि  ही  पेस्ट  बाजूला  ठेवावे.
 •  १  वाटी  मैद्यामध्ये,  १/४  वाटी  तांदळाचे  पीठ,  २  चमचे  रवा  आणि  दही  घालावे.  हाताने  थोडे  कालवून १  तास  झाकून  ठेवावे.
 • ह्या  पिठाच्या  मिश्रणात  बारीक  वाटून  ठेवलेली  पेस्ट,  जिरे,  सोडा,  आणि  चवीनुसार  मीठ  घालून  पीठ  कालवावे.  हे  पीठ  पातळ  न  करता  लागल्यास  पाणी  घालावे.
 •  कढईत  तेल  तापवून  वरील  पिठाची  गोल  बज्जी  हाताने  किंवा  चमच्याने  घालावीत  व  मध्यम  आचेवर  खरपूस  तळून  काढावीत.
 •  गरमागरम  मैसूर  बज्जी  सर्व्ह  करण्यासाठी  तयार  आहेत.  चटणी  बरोबर  गरम  खायला द्यावेत.
तर काय मंडळी, बनवणार का गरमागरम मैसूर बज्जी…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Karnataka special Mysore Bajji -Mysore Bonda in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: