Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

Author: Deepjeevani

अशी असावी मैत्री-Friendship

अशी असावी मैत्री-Friendship

If you are done reading “अशी असावी मैत्री-Friendship”

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!

 झाडे  लावा!!!  झाडे  वाचवा!!!  झाडे  जगवा!!! 

एका  दिवसात  सामान्यत:  माणूस ३ सिलिंडर  भरतील  इतक्या

प्राणवायूचे (Oxygen)  श्वसन करतो. एका Oxygen सिलिंडरची  सरासरी  किंमत  रु. ७००  आहे. म्हणजे  एका दिवसाला  एक  माणूस  रु. २१०० चा  प्राणवायू  वापरतो.

सबंध  वर्षाचा  हिशोब  करता  हि  किंमत  रु.७,६६,५००  इतकी  येते.
सरासरी  आयुष्य  जर  ६५ धरले  तर  हीच  किंमत  साधारणपणे  रु. ५ कोटी  इतकी  येते.

Save Trees

 

हा  प्राणवायू  आपल्याला  आपल्या  आजूबाजूला  असलेल्या  झाडांपासून  जवळ  जवळ  फुकट  मिळत  असतो. आणि  आपण  झाडांची  कत्तल  करीत  सुटलो  आहोत.

झाडे  लावा!!!  झाडे  वाचवा!!!  झाडे  जगवा!!!  

सर्व  मित्रांनी  याचा  प्रसार  आणि  प्रचार  करावा  अशी  विनंती  आहे…

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here



दीपजीवनी टिप्स (10)-घरगुती उपाय

 

दीपजीवनी टिप्स : घरगुती उपाय

 

  • जेवण  झाल्यानंतरचे  उरलेले  अन्न  फ्रीजमध्ये  ठेवण्यापूर्वी  ते  झाकण  लावून  ठेवण्याऐवजी  मोठ्या दुकानात  मिळणाऱ्या   रॅपर  प्लास्टिक  पेपरचा  वापर  करावा. भांड्यात  अन्न  काढून  घेऊन  त्यावर प्लास्टिक  पेपर  घालावा .भांड्याच्या  बाहेरून  तो भांड्याला  चिकटून  बसतो. त्यामुळे  अन्न  जसेच्या तसे  राहते. हा  प्लास्टिक  रॅपर  रोल  मोठ्या  दुकानात  मिळतो.

 

  • चहाचा  चोथा  फेकू  नका  तो  स्वच्छ  धुवून  पाण्यात  उकळून  घेवून  त्या  पाण्याने  केस  धुवा. केस  काळे व  चमकदार  होतात.

 

  • बदामाची  टरफले  टाकून  न  देता  जाळून  त्याची  राख  करावी.  त्यामध्ये  लवंग  व  सैधव  मीठ  घालून  दात  घासावेत  दात  चमकदार  होतात.

 

  • बटाटे  उकडलेल्या  पाण्याने  तेलकट  भांडी  स्वच्छ  करा. अथवा  सिंक  स्वच्छ  करा. याशिवाय  चांदीचे  दागिने या  पाण्यात  ब्रशने  घासून  स्वच्छ  करा.

 

  • वापरलेल्या  लिंबाच्या  साली  सुकुवून  वाटून  घ्याव्यात  व  त्या  पावडरमध्ये  थोडे  दुध  व  हळद  मिसळून  त्वचेवर  लावावी . त्वचा  उजळते.

 

  • सेलो  टेप  अत्यंत  पातळ  असतो  त्यामुळे  त्याचे  टोक  लवकर  सापडत  नाही . सेलो  टेप  जरावेळ फ्रीजमध्ये  ठेवल्यास  त्याचे  टोक  सुटते.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


साधे सरळ घरगुती उपाय/टिप्स

साधे-सरळ-घरगुती-उपाय

 

 

  • भिंतीवर  चिकटलेला  सेलोटेप  अतिशय  खराब  दिसतो . हा  सेलोटेप  काढण्यासाठी  त्यावर  गरम  वस्तू ठेवावी  म्हणजे  हा  टेप  सहज  निघतो .

 

  • लोकरीच्या  शाली , स्वेटर्स  यांना  कसर  लागू   नये  म्हणून  त्यांच्या  घडीत  लवंगा  व  काळ्या  मिरीचे दाणे  ठेवा.

 

  • जखमेतून  होणारा  रक्तस्त्राव  थांबवण्यासाठी  जखमेवर  साखर , कॉफी  पावडर  किंवा  जाळलेला  कापूस लावावा .

 

  • पाण्याच्या  माठाची  छिद्रे  वर्षभर  वापरल्यावर  बुजतात . दर  २  महिन्यांची  माठ  चोळून  धुवावा  व  पंधरा  मिनिटे  गॅसवर  चांगला  तापवावा . छिद्रे  मोकळी  होतात  व  पाणी  छान  थंड  होते .

 

  • भाजल्यामुळे  झालेल्या  जखमांवर  तांदळाचे  पीठ  लावल्यास  थंडगार  वाटते . जखम  भरण्यास  तात्पुरती  मदत  होते .

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


असं असतं का प्रेम?

असं असतं का प्रेम?

एका डॉक्‍टरांकडे एक ८०-८५ वर्षांचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० चा सुमार. ते डॉक्‍टरांना म्हणाले, थोडं लवकर होईल का काम? मला ९ वाजता एकीकडे जायचंय. डॉक्‍टरांसमोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं. त्यांनी जखम तपासली, सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायची तयारी केली. दरम्यान, ते त्या गृहस्थाशी गप्पा मारत होते.

“”आजोबा, ९ वाजता दुसऱ्या डॉक्‍टरांची अपॉइंटमेंट आहे का?”

“”नाही! मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्‍ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचंय.”

“”हॉस्पिटलमध्ये? आजारी आहेत का त्या?”

“”हो! गेली पाच वर्षे हॉस्पिटलमध्येच आहे ती.”

“”अच्छा! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत, तर वाट पाहतील ना त्या? काळजीही करतील…?”

“”नाही डॉक्‍टर. तिला “अल्झायमर्स’ झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.” आजोबा शांतपणे म्हणाले.

डॉक्‍टर चकित होऊन म्हणाले, “”आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्‍ता करायला इतक्‍या वेळेवर आणि धडपडून जाता? त्या तुम्हाला ओळखतही नसताना?”

त्यावर पुनः तितक्‍याच शांतपणे म्हातारे गृहस्थ म्हणाले, “”डॉक्‍टर ती मला ओळखत नसली, तरी मी तिला गेली कित्येक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती, आणि माझं जिवापाड प्रेम आहे तिच्यावर.”

ऐकता ऐकता डॉक्‍टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गळा दाटून आला. त्यांच्या मनात आलं, “”हे खरं प्रेम; प्रमे म्हणजे काही नुसतं घेणं नव्हे, तर त्याबरोबर कितीतरी देणं, निरपेक्षपणे स्वतःकडचा आनंद लुटवणं, उधळणं – त्या गृहस्थांसारखं.”

अचानक इंटरनेटवरून आलेल्या अनेक संदेशांमधला एक संदेश डॉक्‍टरांना आठवला-

“”चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहेमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही – पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात.”

यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी, आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं….

खरंच मिळेल असं प्रेम आपल्याला अन्‌ जमेल का असं प्रेम करणं आपल्याला?…

Source: Internet

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: