- छोटे छोटे कपडे फारच मळलेले असतील तर साबण, सोडा घालून प्रेशर कुकरमधून शिट्टी करून काढावेत. भट्टी केल्यासारखे घराच्या घरी स्वच्छ होतात.
- रंग गेल्याने फिकट झालेली जीन पॅन्ट नव्या कोऱ्या जीनच्या पॅन्टबरोबर धुलाई मशीनमध्ये धुतल्यास नवीन पॅन्टचा रंग जुन्या फिकट पॅन्टला बसून जुनी पॅन्टही छान दिसू शकते.
- गॅसची शेगडी धुताना दोन्ही बर्नरवर स्टीलच्या वाट्या पालथ्या घालाव्यात .बर्नरच्या छिद्रातून पाणी , कचरा , साबण आत शिरणार नाही व गंज चढणार नाही.
- घरात छान फ्रेश सुगंध दरवळावा असे वाटत असेल तर ( विशेषत; स्वयंपाकात मासळी असेल तर) एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात संत्राच्या साली टाकाव्यात.
- दोडक्याच्या शिरा ,लाल भोपळ्याची साले, कोथिबिरीच्या काड्या टाकून न देता तव्यावर परतवून त्यात मिरची, मीठ, साखर, तीळ, लिंबू पिळून हा ठेचा करावा. अत्यंत चविष्ट होतो.
- चांदीची प्लेन भांडी काळी पडल्यास त्यावर दाताची पावडर आणि पाणी यांचे मिश्रण घासले तर भांडी चमकदार दिसतात.
You may also interested in,
To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here
|