Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

मराठी घरगुती उपाय घरच्या घरी

मराठी घरगुती उपाय घरच्या घरी

 

  • लोकरीचे  कपडे  चुकून  कडक  डिटर्जंटमध्ये  धुतले  गेल्यास  नंतर  केसांचा  शाम्पू  मिश्रित  पाण्यात थोडावेळ  भिजवावेत . त्याचा  आकार  जर  वेडावाकडा  झाला  असेल  किंवा  ते कडक  झाले  असतील तर शाम्पुमुळे   मऊ  व  पूर्ववत  होतात .

 

  • काचेच्या   टेबल्यावर  जर  ओरखडे  उमटले  असतील  तर  त्या  ठिकाणी  टूथपेस्ट   लावली  असता  ते दिसेनासे  होतील .

 

  • सफरचंद   एकमेकांना  स्पर्श  होऊ  न देता  ठेवल्यास  अनेक  दिवस  टिकतात . तसेच  कापलेले सफरचंदाचे  काप   १० मिनिट  मिठाच्या  पाण्यात  बुडवून  ठेवावेत  म्हणजे  कडक  तर  राहतातच  शिवाय रंगही  बदलत  नाही.

 

  • उदबत्ती पेटवण्यापुर्वी पाच  मिनिटे  ओल्या  फडक्यात  गुंडाळून   ठेवली   तर अधिक  वेळ  चालते .

 

  • बूट व  चपलांवर  कापसाने  , चिंधीने   थोडे  ग्लिसरीन  चोळल्यास  पॉलिश  करण्याचा   खर्च  वाचतो   व  ते अधिक काळ   टिकतात .

 

  • त्वचेत   रुतलेलं   अगदी   छोटं लाकडाचं   तूस चिमट्यातही   धरता  येण्यासारखं  नसलं  तर  ते  काढण्यासाठी   त्या  भागावर  फेव्हिकॉलचे   ३-४  थेंब  लावून   ते  सुकवा . नंतर  ते  पातळ पापुद्रा  खेचला  की   कण / तूस   निघून   येईल.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: