Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
Advertisements

फोडणीचे पोहे-कांदा पोहेकांदे पोहे

Click here to see Kaande Pohe or Kaanda Poha recipe in English

फोडणीचे पोहे-कांदे पोहे

 

फोडणीचे पोहे-कांदे पोहेसाहित्य :-

  • २ वाट्या जाड पोहे निवडून घेणे
  • २ कांदे बारीक चिरून
  • ५-६ हिरव्या मिरच्या चिरून
  • ६-७ कढीलिंब
  • अर्धी वाटी खोवलेले खोबरे
  • मुठभर चिरलेली कोंथिबीर
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार साखर
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल
  • १/२ वाटी शेंगदाणे [optional ]
  • १ चमचा मोहरी
  • १ चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • अर्धा चमचा हळद
  • १ मध्यम आकाराचा बटाटा
  • अर्धा कप वाटणे [मटार] [optional ]

 

कृती :-

  • कांदे चिरून, बटाटे चिरून, मिरच्या चिरून, कढीलिंब , कोंथिबीर चिरून, नारळ खवून, लिंबाचा रस काढून सर्व तयारी करावी.
  • भोकांच्या चाळणीत (रोवळीत) पोहे हलक्या हाताने धुवावेत.
  • पातेले तापत ठेवून तेल घालावे व तेल तापल्यावर मोहरी ,जिरे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी.
  • फोडणीत मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालून लगेच कांदा व बटाटा घालावा.
  • गॅस मंद करून कांदा व बटाट्यावर चिमूटभर मीठ व साखर घालून कांदा व बटाटाला १ वाफ द्यावी.
  • कांदा पारदर्शक झाल्यावर व बटाटा शिजल्यावर भिजवलेले पोहे घालावेत व लगेच चवीनुसार मीठ,साखर व अर्ध्या लिंबाचा रस घालून पोहे उलथण्याने चांगले ढवळावेत.
  • गॅस अगदी मंद ठेवून झाकण घालून दोन वाफा द्याव्यात व दोन वाफांमध्ये चांगले ढवळावे म्हणजे मीठ,साखर सर्व पोह्याला सारखे लागेल .
  • आवडीनुसार खोबरे,कोंथिबीर पोह्यात घालून नीट ढवळून खाण्यास द्यावे अथवा डिशमध्ये पोहे घालून खोबरे,कोंथिबीर घालून दिश सजवावी.

 

टीप:-

  • वरील पोह्यात मटारच्या दिवसांत वाटीभर मटार अथवा मूठभर भाजके दाणे घालून पण पोहे छान लागतात.
  • पोह्यात आवडत असल्यास १ मोठा टोमॅटो बारीक चिरून कांद्याबरोबर घालावा.  टोमॅटो मुळे पोहे ओलसर होतात व लिंबू घालायची जरूर पडत नाही.
  • चार्तुर्मासात कांदा घालायचा नसेल तर फ्लावर अथवा पानकोबी घालून उत्तम पोहे होतात.
  • पोहे जरा जास्त तेलात स्वादिष्ट होतात. पण कमी तेलात करायचे असतील तर कांदा परतण्याइतपत तेल घालावे व कांदा परतल्यावर पाव वाटी पाणी आधी फोडणीत घालून मग पोहे टाकावे. म्हणजे तेल कमी घालून सुद्धा मऊसर पोहे होतात.
  • पोह्यांवर ओला नारळ नसेल तर सुके खोबरे किसून घालून पोहे चांगले लागतात . खोबऱ्याचा कीस वापरायचा असेल तर मुठभर भाजके दानेपण वापरावेत.खमंग लागतात.
  • पोह्यावर डिशमध्ये खायला देताना बारीक शेव घालावा.त्यामुळे पोहे स्वादिष्ट लागतात.

 

तर काय मंडळी, बनवणार का झटपट फोडणीचे पोहे-कांदे पोहे…? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Kaande Pohe or Kaanda Poha recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: