Advertisements

दीपजीवनी टिप्स (10)-घरगुती उपाय

 

दीपजीवनी टिप्स : घरगुती उपाय

 

  • जेवण  झाल्यानंतरचे  उरलेले  अन्न  फ्रीजमध्ये  ठेवण्यापूर्वी  ते  झाकण  लावून  ठेवण्याऐवजी  मोठ्या दुकानात  मिळणाऱ्या   रॅपर  प्लास्टिक  पेपरचा  वापर  करावा. भांड्यात  अन्न  काढून  घेऊन  त्यावर प्लास्टिक  पेपर  घालावा .भांड्याच्या  बाहेरून  तो भांड्याला  चिकटून  बसतो. त्यामुळे  अन्न  जसेच्या तसे  राहते. हा  प्लास्टिक  रॅपर  रोल  मोठ्या  दुकानात  मिळतो.

 

  • चहाचा  चोथा  फेकू  नका  तो  स्वच्छ  धुवून  पाण्यात  उकळून  घेवून  त्या  पाण्याने  केस  धुवा. केस  काळे व  चमकदार  होतात.

 

  • बदामाची  टरफले  टाकून  न  देता  जाळून  त्याची  राख  करावी.  त्यामध्ये  लवंग  व  सैधव  मीठ  घालून  दात  घासावेत  दात  चमकदार  होतात.

 

  • बटाटे  उकडलेल्या  पाण्याने  तेलकट  भांडी  स्वच्छ  करा. अथवा  सिंक  स्वच्छ  करा. याशिवाय  चांदीचे  दागिने या  पाण्यात  ब्रशने  घासून  स्वच्छ  करा.

 

  • वापरलेल्या  लिंबाच्या  साली  सुकुवून  वाटून  घ्याव्यात  व  त्या  पावडरमध्ये  थोडे  दुध  व  हळद  मिसळून  त्वचेवर  लावावी . त्वचा  उजळते.

 

  • सेलो  टेप  अत्यंत  पातळ  असतो  त्यामुळे  त्याचे  टोक  लवकर  सापडत  नाही . सेलो  टेप  जरावेळ फ्रीजमध्ये  ठेवल्यास  त्याचे  टोक  सुटते.

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: