Advertisements

झटफट उपमा रेसिपी नाष्ट्यासाठी – उप्पीटची रेसिपी

Click here to see Upma or Uppit recipe in English

झटफट उपमा रेसिपी

झटफट उपमा रेसिपी नाष्ट्यासाठी

साहित्य :-

 • २ वाट्या जाड रवा
 • २ मोठे कांदे बारीक चिरून
 • १ मोठा बटाटा
 • १ टोमॅटो [opational ]
 • ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • १०-१२ कढीलिंबाची पाने
 • ३-४ लाल सुक्या मिरच्या
 • मीठ
 • साखर चवीनुसार
 • अर्ध्या लिंबाचा रस
 • १ चमचा साजूक तूप
 • अर्धा वाटी खोवलेला ओला नारळ
 • कोंथिबीर बारीक चिरून
 • फोडणीकरता मोहरी, जिरे, हिंग

कृती :-

 • कढईत मंद आचेवर रवा गुलाबी रंगावर भाजून काढून ठेवावा.
 • पातेलीत ४ वाट्या पाणी उकळायला ठेवावे.
 • एका जाड बुडाच्या पातेलीत ३ टेबल स्पून तूप घालावे व तूप तापल्यावर मोहरी,जिर व हिंग घालून फोडणी करावी. त्यात कढीलिंब , सुक्या मिरच्या टाकून कांदा व बटाटे टाकावेत. व मिरची टाकावी व दोन वाफा येऊ द्याव्यात .
 • बटाटे शिजले की भाजून ठेवलेला रवा टाकून थोडे परतावे. त्यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. १ टोमॅटो आवडत असल्यास चिरून टाकावा.
 • गॅस मंद करून रव्यात उकळलेले चार वाट्या पाणी थोडे घालत रवा सारखा ढवळावा, गुढळी न होता रवा चांगला फुलून आला पाहिजे.
 • सर्व पाणी घातल्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा द्याव्यात.
 • तयार उपम्यावर खोबरे, कोंथिबीर घालून खाण्यास द्यावा.

टीप:-

 • उपमा तयार झाल्यावर १ चमचा साजूक तूप सोडावे. स्वादिस्त लागतो.
 • उपम्यात आवडत असल्यास फोडणीत १ चमचा उडदाची डाळ, १ चमचा हरभळा डाळ व मिठ्भर काजू घालावा. उपमा छान लागतो.
तर काय मंडळी, बनवणार का झटपट उपमा …? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

 

Click here to see Upma or Uppit recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: