Click here to see Easy to Cook Chinese Gobi Manchurian Recipe!! in English
भारतीय पाककृती||गोबी मन्चुरिअन
चैनीस गोबी मन्चुरिअन बनवण्यासाठी साहित्य:-
- १ मध्यम आकाराचा फुलकोबी (फ्लॉवर )
- ३/४ कप मैदा
- १-१/२ चमचा लसुन पेस्ट
- २ चमचे तेल
- १ चमचा मक्याचे पीठ
- १-१/२ चमचा आलं पेस्ट
- १ कप बारीक चिरलेले कांदे
- १/४ चमचा अजिनोमोटो
- १ हिरवी मिरची बारीक चिरून
- २-३ चमचा टोमॅटो सॉस
- २ चमचा सोया सॉस
- कोंथिबीर बारीक चिरून (सजावटीसाठी )
- मीठ चवीनुसार
- पाणी
कृती :-
- पहिला फुलकोबी (फ्लॉवर ) कापुन स्वच्छ धुवून घ्यावे .
- नंतर मैदा , मक्याचे पीठ ,मीठ आणि पाणी घालून सर्व मिक्स करून घेऊन पीठाची चांगली पेस्ट तयार करावी .
- नंतर त्यात आलं लसुन पेस्ट घालून मिक्स करावे .
- नंतर कॉलीफ्लावरचे फ्लोरेट्स (फ्लॉवरचे तुकडे ) भिजवलेल्या पिठात बुडवून लाईट ब्राऊन रंगावर तळून घ्यावेत .
- कढईत तेल गरम करून त्यामध्ये उरलेले आलं ,लसुन पेस्ट ,बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घालून सर्व मिक्स करून घ्यावे .
- नंतर अजिनोमोटो ,सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घालून पुन्हा मिक्स करून घ्यावे .
- नंतर त्यात तळलेले फ्लोरेट्स घोळवून गरमा गरम सर्व्ह करावे .
- हवे असेल तर सजावटीसाठी गोबी मन्चुरिअन वरती कोंथिबीर घालावी .
तर काय मंडळी, संध्याकाळी बनवणार का गोबी मन्चुरिअन…? तुम्हाला नक्कीच आवडेल.आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा |
Click here to see Easy to Cook Chinese Gobi Manchurian Recipe!! in English
You may also interested in,
- मराठी शुभेच्छा पत्रे
- मी मराठी/Me Marathi
- दीपजीवनी टिप्स–घरगुती उपाय/Deepjeevani Tips,
- मराठी कविता/Marathi Poems,
- मराठी विनोद/Marathi Jokes,
- वर्गीकृत शब्दावली (शब्दकोश )||Glossary
- आमचा भारत-आमची संस्कृती-रांगोळी
- मराठी म्हणी
To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here
Advertisements
VERY NICE AND TASTY
Very nice information…