Advertisements

काही जीवनाचे धडे – मराठी सुविचार

butterfly-marathi-suvichar-board

 

You may also interested in,

   To Go to Freedom Marathi Home click here
 To Go back to Deepjeevani Home click here

Advertisements

मक्याच्या पीठाचे कांदा भजी

 

Click here to see “Maize flour onion Pakoda recipe in English

मक्याच्या पीठाचे कांदा भजी

मक्याच्या पीठाचे कांदा भजी

साहित्य:-

 • 4-5 मोठे कांदे
 • 2 वाट्या मक्याचे पीठ
 • 4 टेबलस्पून तांदळाची पिठी
 • 2 चहाचे चमचे तिखट
 • अर्धा चहाचा चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 चहाचा चमचा ओवा
 • कोंथिबीर बारीक चिरून [optional ]
 • 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून [optional ]
 • भजी तळण्याकरता तेल

 

कृती:-

 1. कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत.
 2. कांद्यावर मक्याचे पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, घालून हलक्या हाताने मिसळावे.
 3. कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कांदा हाताने मोकळा करून वेड्यावाकड्या आकाराची भजी घालावीत. व खरपूस तळून काढावीत.
 4. गरम गरम खायला द्यावेत.

 

टिप्स:-

 1. भजी जरा झणझणीत आवडत असल्यास 2-3 मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.
 2. भजी गरम गरम खावे. थंड झाल्यास मऊ पडते.

 

Click here to see “Maize flour onion Pakoda recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


कुरकुरीत चविष्ट कॅबेज भजी-कोबीची भजी


Click here to see “Cabbage Pakoda Bhaji recipe”
 in English

कॅबेज भजी [कोबीची भजी]

कुरकुरीत चविष्ट कॅबेज भजी

साहित्य:-

 • पाव किलो बारीक चिरलेली पानकोबी [कॅबेज ] [कोबी ]
 • 4 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
 • 2 टेबलस्पून तांदळाची पिठी
 • 1/2 वाटी मक्याचे पीठ
 • 1/2 वाटी बेसन
 • 1 टिस्पून हळद
 • लाल तिखट
 • चवीपुरते मीठ
 • कोंथिबीर बारीक चिरून [optional ]
 • 2-3 मिरच्या बारीक चिरून [optional ]
 • तळण्याकरता तेल

कृती:-

 1. कोबी चिरून घ्यावेत.
 2. कोबीवर कॉर्न फ्लॉवर, तांदळाची पिठी, मक्याचे पीठ, बेसन, हळद, लाल तिखट, मीठ घालून हलक्या हाताने मिसळावे.
 3. कढईत तेल तापायला ठेवावे व तापलेल्या तेलात कोबीचे भजी घालावीत व खरपूस तळून काढावीत.
 4. गरमा गरम खायला द्यावेत.

टिप्स:-

 1. भजी जरा झणझणीत आवडत असल्यास 2-3 मिरच्या बारीक चिरून घालाव्यात.
 2. मक्याचे पीठ नसेल तर फक्त बेसन पीठ घालून भजी करावी.

 

Click here to see “Cabbage Pakoda Bhaji recipe” in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


गाजराचा हलवा कसा करायचा-सरळ सोपी पाककृती


Click here to see “Gajar Halwa or carrot halwa recipe”
 in English

गाजराचा हलवा

गाजराचा हलवा कसा करायचा-सरळ सोपी पाककृती

साहित्य :-

 • 1 किलो लाल गाजरे
 • अर्धा लिटर दूध
 • 2 वाट्या साखर
 • 4-5 वेलदोड्याची पूड
 • बेदाणे
 • 5-6 काजूचे बारीक तुकडे
 • 2 टेबलस्पून साजूक तूप
 • खवा [optionl ]

कृती :-

 1. प्रथम गाजर स्वच्छ धुवून साल सोलून घ्यावीत व बारीक किसणीवर किसून घ्यावीत.
 2. गाजराच्या किसात सर्व दूध एकदम घालू नये.कीस शिजवताना दर वाफेला अर्धा कप दूध घालून ढवळावे. दूध आटेपर्यंत ढवळावे म्हणजे गाजराचा कीस मऊ शिजतो.
 3. दूध आटल्यावर 2 वाट्या साखर घालावी व परत सुकेपर्यंत ढवळावे.
 4. हलवा साखर विरघळून कोरडा झाला की 2 टेबलस्पून साजूक तूप पातेल्यात सर्व बाजूनी सोडावे व सर्व हलवा तुपावर खमंग परतावा.
 5. हलवा मध्ये वेलदोडे पूड, बेदाणे व काजूचे तुकडे घालून परत परतून घ्यावे आणि पातेले खाली उतरावे.
 6. गरम खायला द्यावेत.

टीप :-

 1. गाजराचा कीस आधी तुपावर परतू नये .दुधात शिजवल्याने त्याचा नैसर्गिक रंग कायम राहतो व हलवा जास्त चविस्ट होतो.
 2. नंतर तूप घालून परतल्याने हलवा खमंग लागतो.

Click here to see “Gajar Halwa or carrot halwa recipe” in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


मोदक पाककृती-गणपती बाप्पांचे आवडते मोदक

Click here to check “मोदक पाककृती-गणपती बाप्पांचे आवडते मोदक” recipe in English

गणपती बाप्पांचे आवडते मोदक

मोदक पाककृती-गणपती बाप्पांचे आवडते मोदक
साहित्य:-

 • 1 नारळ खवून
 • 1 वाटी चिरलेला गुळ अथवा 1 वाटीभर साखर
 • 4,5 वेलदोड्याची पूड
 • 1 वाटी गहू पीठ [कणीक]
 • चिमूटभर मीठ
 • 2 टेबलस्पून कडकडीत तेल
 • काजू काप
 • बदाम काप
 • बेदाणे
 • तळण्याकरता तेल


कृती :-

 1. 1 खवलेले नारळ, साखर अथवा गुळ घालून सारण चिकट होईल असे शिजवून घ्यावे व वेलदोडा पूड घालून त्यामध्ये काजू काप, बदाम काप, बेदाणे घालून सारण मिक्स करून ठेवावे.
 2. कणीक मध्ये कडकडीत तेलाचे मोहन, मीठ घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
 3. भिजवलेला कणीक हाताने चांगला मळून लाट्या कराव्यात.
 4. पोळपाटावर पुरीएवढी लाटी लाटावी. हातावर घेऊन मुखऱ्या पाडून वाटी करावी. 1 चहाचा चमचा भरून सारण मध्ये भरावे व मोदकाचे तोंड बंद करावे.असे सर्व मोदक भरून घ्यावेत.
 5. कढईत मंद आचेवर सर्व मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.


टीप  :-

 1. हवे असल्यास सारणात केशर व 50 ग्रॅम खवा घालावा. मोदक छान लागतात.
तर काय मंडळी, बनवणार का गोड मोदक …? तुम्हाला नक्कीच आवडेल.

आपले प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा

Click here to check “मोदक पाककृती-गणपती बाप्पांचे आवडते मोदक” recipe in English

You may also interested in,

 To Go to Freedom Marathi Home click here
To Go back to Deepjeevani Home click here


%d bloggers like this: